Posts

पहिला धडा - निसर्ग ज्ञान

#JungleVibes पहिला धडा  - निसर्ग ज्ञान सांगली जिल्ह्यातील तासगाव आमचे मुळ गाव, तेथे आमचे वडलोपार्जित शेत होते. लहानपणी आम्ही दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शेतात जात असु, माझे काका काकी तेथेच रहात असत. फार सुंदर असे शेत होते आमचे !  त्यात मका, ज्वारी, गहू, हरभरा, ऊस इ पीके निघत शिवाय केळी, सिताफळ, रामफळ, कवठ यासारखी फळझाडे पण खुप होती. शेजारील शेतात द्राक्षाचे मळे होते. घरासमोरील जागेत वांगी, टोमॅटो, पावटा, अंबाडी, मेथी, गवारी, पोकळा इत्यादी भाजीपाला पिकत असे. तेथे आमचे एक तीनपाकी दगडी कौलारू घर होते.  घराजवळच छोटेसे खळे होते आणि घरामागे बांधीव विहीर होती. विहीरवर रहाट होती.  तेथे दुष्काळ पाचवीलाच पुजला असल्याने उन्हाळ्यात विहीर पुर्णपणे आटायची पण दिवाळीच्या दरम्यान हमखास टम्म भरलेली असायची. विहीरीवर बसवलेल्या पंपाचे पाणी पाटाने संपुर्ण शेतात फिरवले होते.  त्या थंडगार पाण्यात पाय सोडून बसणे स्वर्गीय आनंद द्यायचे. घरावर हमखास दुधी भोपळ्याचा वेल सोडलेला असे, फार चवीष्ट लागायची त्या दुधीची भाजी. अंगणातच काही लिंबू, इडलिंबू, शेवगा, पेरू, कढीपत्त्याची झाडे हो...

जंगल, चकवा आणि वाघ

जंगल, चकवा आणि वाघ           साधारणत साल 2006 मधील घटना असेल मी त्याकाळात दाजीपूर अभयारण्यात वरचेवर जात असे अभयारण्यातील चप्पा चप्पा फिरलोय मी.  दरवर्षी प्राणी गणना उपक्रमात सहभागी होने हा माझा नियमित कार्यक्रम असायचा.  बुद्ध पोर्णिमेला मचाणावर बसून प्राणी गणना करने म्हणजे एक पर्वणीच असायची.  अभयारण्यातील मोक्याच्या मचाणावर बसण्यासाठी मी नेहमीच विषेश प्रयत्न करत असे.  वन्यजीव विभाग मधील अनेक कर्मचारी ओळखीचे असल्याचा हा फायदा होता.           एकदा असाच नेहमीप्रमाणे बुद्ध पोर्णिमेला वन्यजीव विभागच्या ऑफिसवर तोंडी कल्पना देऊन दाजीपूर मधील भोपळीची सरी नाव असलेल्या ठिकाणी बनवलेल्या मचाणावर प्राणी गणनेसाठी जाऊन बसलो.  दुपारी बारा वाजता मचाणावर चढलो आणि लवकरच सेट होऊन प्राण्याची चाहुल घेत बसलो. दुपारी भेकराची एक जोडी पाणी पिऊन गेली.  सायंकाळी पाच वाजता पाठीमागून खसखस आवाज येऊ लागला.  तसे कान टवकारून डोळे फाडून त्या दिशेस बघू लागलो.  आवाज वाढतच गेला तशी आमची उत्कंठा...

जंगल आणि चकवा

जंगल आणि चकवा साधारणत वीस-एक वर्षा पुर्वीची गोष्ट असेल, त्यावेळी आमचे टू व्हीलर स्पेअर पार्ट्स किरकोळ विक्री चे दुकान होते.  वेळ मिळेल तेव्हा मी जंगलात फिरायला जात असे.  बहुतांश वेळा प्रत्येक सोमवार ठरलेलाच असे, कारण तो आमचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असे. दाजीपूर, आंबा, चांदोली, बर्की, सागरेश्वर इ अनेक जंगल अक्षरशः पालथे घातले या काळात.  माझा हा शौक अनेक मिस्त्री लोकांना माहित होता त्यापैकी बरेच जण नेहमीच मला आपल्या सोबत घेऊन जा अशी विनंती करत असत.  परंतू मी हसून दुर्लक्ष करे. पण एक मिस्त्री होते बबनराव!  त्यांनी माझा चांगलाच पाठपुरावा केला, शांत सुस्वभावी व आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक असे बबनराव माझे खुप चांगले मित्र आहेत. प्रत्येक मंगळवारी मला विचारायचे काल कोठे गेला होता? काय काय बघितले?  दुकान शेजारील हाॅटेल मधे चहाचे झुरके घेत घेत मी पण त्यांना सगळे सविस्तर सांगायचो.  अनेकदा त्यांच्या सोबत योगेश (बारक्या) हा त्यांचा किडकिडीत हेल्पर पण असायचा. तो तर आमचे हे संभाषण गुंग होऊन ऐकायचा.  चहाचे बिल मीच देणार या वादात ते मला नेहमी बोलायचे फारूक-अ...

जंगलाचे आरोग्य

जंगलाचे आरोग्य खुप वर्षांपासून जंगलात जाण्याचा योग आला नव्हता.  जबर इच्छा होती जंगलात चालत फिरायची.  मग काय लावला फोन धनंजयला म्हटल "जंगलात जाऊया चल " तर लगेच तयार झाला म्हटला  "या सोमवारी जाऊया " कामाच्या नादात मी विसरून गेलो पण रविवारी मॅच संपल्यावर पठ्ठ्याचा फोन "ऊद्या जायच नव्ह? " मी जरा उदासीचेच बोललो "बघू" तर म्हणतय कसा "मी आणखीन दोघांना तयार केलय जर तुम्ही कॅन्सल केल तर तुम्हाला आमच्या संपूर्ण ट्रीपचा खर्च द्यावा लागेल."  मी पैश्याला तसा मुलखाचा चिकट नाईलाजाने म्हटल "येतो उद्या" सोमवारी सकाळीच तीघे जण दारात गाडी घेऊन हजर, मी विचारल्यावर धनंजय बोलला मुडागडला जायचय. तस मी घाबरतच म्हटल फार चालाव तर लागणार नाही ना? तसा धनंजय बोलला बसा गाडीत दोन-तीन तासाचा ट्रेक आहे, थोडीफार चढाई आहे पण जंगल मस्त आहे. मी शुज चढवून गुमान बसलो गाडीत.  मजल दरमजल करत बाजारभोगाव मधे पोहोचलो.  तेथे 'गुडलक सोन्या' या नावाचे एक छोटेखानी हाॅटेल आहे.  गेली 25 वर्ष तेथे अल्पोपहार करतोय वडापाव, मिर्ची भजी, मिसळ, कटवडा, कांदापोहे, शिरा.  सगळे...

गजराज

Guess what I'm holding 🤔🤪 गेल्या आठवड्यात श्रुती, नागालैंड गर्ल अचानक घरी भेटायला आली. अनेक विषयांतर चर्चा करना करता अचानक प्रवीण कडे वानोशी फाॅरेस्ट होम स्टे ला जायचच असा हट्ट केली.  म्हटल 'जाऊ या' तस ती  2018 पासून पाठी लागली होती.  वानोशी फुल्ल बुकिंग असल्यामुळे शनिवार-रविवार ऐवजी रविवार -सोमवार ठरले.  तेथे  कॅमेरा ट्रॅप लावायचे असल्याने अमितला सोबत घेतले. रविवारी पहाटे सहा वाजताच कोल्हापूर सोडले. चंदगडला मस्त पैकी नाष्टा करून पारगड फाट्याला पक्षितज्ञ अजित पाटलांना भेटलो.  थोडेफार पक्षी विषयक चर्चा करून तिलारी गाठले.  तेथे लष्कर पाइंटला साइट सिईंग करून घाट उतरलो.  घाट संपल्यावर सपाट पण वळणावळणाचा रस्ता लागला.  साधारणत दहा वाजले होते, एका ओढ्याच्या पुलावर थांबलो होतो तेथे प्रवीण सातोसकर हा दोडमार्ग मधील सर्वोत्कृष्ट पक्षी निरिक्षक भेटला.  चर्चा करत असताना तो बोलला या ओढ्यांत थोडे पुढे चालत गेलात की तेथे एका वडाच्या झाडाला फळे लागलीत, खुप प्रकारचे पक्षी आलेत ते खायला.  मग काय घुसलो त्या ओढ्यात!!!  मी, श्रुती, तिची बहीण श्...

तुला नं मला, घाल कुत्र्याला ...

तुला नं मला, घाल कुत्र्याला ... दरवर्षी परतीचा पाऊस सुरू झाला की निसर्गाचा करिश्मा बघायला सहकुटुंब एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जायच, मनमुराद भटकायच असा आमचा कार्यक्रम ठरलेलाच असतो.   यंदा आंबोलीत जायच ठरवल.  कारणही तसेच होते. या वर्षी माझा खास वन्यजीव मित्र काका भिसेने पार्टनरशिप मधे एक रिसोर्ट चालू केलय.  खुप आग्रहपूर्वक बोलवत होता. म्हणायचा 'फारूक एकदा येऊन बघच, तुला नक्कीच आवडेल'.  तसा काका मला नेहमीच वेगवेगळी निसर्गरम्य ठिकाणे सुचवत असतो आणि ती खरोखरच फार सुंदर, गर्दी गोंगाट पासून दूर असतात.  हे तर त्याचे स्वतःचे ठिकाण. दोन रात्र तीन दिवस असा प्लॅन ठरला.  ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर कोल्हापूर सोडले. नेहमीचा निपानी, गडहिग्लज हा मार्ग न धरता गारगोटी मार्गे निघालो.  जाता जाता नितवडे दोनवडे येथील धबधबे बघायचे व पुढे आंबोलीत संध्याकाळ पर्यंत पोहोचायचे असा काहीसा प्लॅन होता. सर्वात आधी सवतकडा धबधब्याला जायच म्हणून तेथे पोहोचलो तर सगळे सुनसान होते, तेथे कोणीच नव्हते.  गाडी पार्क करून धबधब्याला खाली उतरून गेलो.  थोडीफार फोटोसेशन केले तोच मागू...

BirdScaping

  BirdScaping If you love birds and want them flying and chippering around your home then just go for  BirdScaping  👉 BirdScaping  is all about optimising your space to attract birds and create a Bird Habitat. You can attract many birds at your home garden / windowsill / balcony / backyards by providing birds with water, food and shelter. BirdScaping includes installing - • Bird baths • Water pots • Bird feeders • Feeding ramp • Nests • Nesting material Water Birds need water for drinking and bathing.  Bird do bath daily all year round not only in summer but also in rains and winter as well.  Birds drink water during summer and winter too. Bird Bath / Water pots Install 2-4 water pots for bird to bath and drink water from.  Birds need cool, fresh and shallow water for drinking and taking baths. Ideally 1" to 2" depth is preferred by birds.  They avoid deeper water. Daily add fresh water and once a week pot cleaning is important. F...