जंगल आणि चकवा
जंगल आणि चकवा
साधारणत वीस-एक वर्षा पुर्वीची गोष्ट असेल, त्यावेळी आमचे टू व्हीलर स्पेअर पार्ट्स किरकोळ विक्री चे दुकान होते. वेळ मिळेल तेव्हा मी जंगलात फिरायला जात असे. बहुतांश वेळा प्रत्येक सोमवार ठरलेलाच असे, कारण तो आमचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असे.
दाजीपूर, आंबा, चांदोली, बर्की, सागरेश्वर इ अनेक जंगल अक्षरशः पालथे घातले या काळात. माझा हा शौक अनेक मिस्त्री लोकांना माहित होता त्यापैकी बरेच जण नेहमीच मला आपल्या सोबत घेऊन जा अशी विनंती करत असत. परंतू मी हसून दुर्लक्ष करे.
पण एक मिस्त्री होते बबनराव! त्यांनी माझा चांगलाच पाठपुरावा केला, शांत सुस्वभावी व आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक असे बबनराव माझे खुप चांगले मित्र आहेत. प्रत्येक मंगळवारी मला विचारायचे काल कोठे गेला होता? काय काय बघितले? दुकान शेजारील हाॅटेल मधे चहाचे झुरके घेत घेत मी पण त्यांना सगळे सविस्तर सांगायचो. अनेकदा त्यांच्या सोबत योगेश (बारक्या) हा त्यांचा किडकिडीत हेल्पर पण असायचा. तो तर आमचे हे संभाषण गुंग होऊन ऐकायचा. चहाचे बिल मीच देणार या वादात ते मला नेहमी बोलायचे फारूक-अब्दुला कधी तरी आम्हाला पण न्या की जंगलात!!
एकदा मी त्यांना सहजच म्हटले जाऊया पुढच्या महिन्यात जंगलात. मग काय त्यांनी पिच्छाच पुरवला माझा, बारक्या तर फारच खुश झालेला. मग मी त्यांना खरोखरच जंगलात न्यायचा प्लॅन बनवला आणि एक दिवसीय जंगल भ्रमंती ठरली.
ऐके सोमवारी भल्या पहाटे आम्ही चौघे टु व्हीलर मोटरसाइकिल वरून निघालो. मी, भैया(जावेदभाई) एका गाडीवर आणि बबनराव व पिंट्या दुसऱ्या गाडीवर.
मजल दरमजल करत आम्ही राधानगरीत पोहोचलो. तेथे एस्टी स्टॅन्डवर गरम गरम वडा पाव वाफाळलेल्या चहा बरोबर खाल्ला, तृप्त आत्मा घेऊन आम्ही पुढे निघालो.
घनदाट जंगलातून आमच्या गाड्या निवांत चालल्या होत्या. सगळेच मंत्रमुग्ध होऊन जंगल निहाळत होते. लवकरच निश्चित जागी पोहोचलो. गाड्या ओळखीच्यांच्या दारात लावून जंगलात निघालो. जंगलात कसे फिरायचे, काय काय नियम पाळायचे इ सर्व सुचना आधीच दिल्या होत्या. त्याची उजळणी घेत घेत निघालो.
बरेचदा मी अश्या सुचना देऊनच न्हेतो. पण सोबतची व्यक्ति जर सम विचारी नसेल आणि फक्त मजा म्हणून आली असेल तर त्यामुळे संपूर्ण प्लॅन फेल होतो. मनस्ताप होतो तो वेगळाच !
मुख्य जंगलात शिरण्यापुर्वी मी सगळ्यांना शांतता राखण्यास सांगून पुढे चालू लागलो. भैया बरेचदा जंगलात आला असल्याने त्यास काही नवीन नव्हते. पण बबनराव व बारक्या आयुष्यात प्रथमच जंगलात आले असल्यामुळे जरा धास्तावलेच होते. त्यात बारक्या तर अवघा 16-17 वर्षाचा!
सुरवातीस तासभर शांतिपूर्ण चालूनही कोणत्याच प्राण्याची साधी चाहूलही लागली नाही. मग मी सरळ जंगल वाचन करण्यास सुरवात केली, चालता चालता दिसणारे प्राण्याच्या पावलाचे ठसे, विष्ठा, झाडांवरील ओरखडे दाखवत होतो. निरनिराळ्या वनस्पती, फुलपाखरे, मुंगा, वारूळ, बिटल्स, बगज् इ ची माहिती देत देत दोन-तीन तासात दुपार पर्यंत बरेच जंगल तुडवले. दोन तीन शेखरू, काही पक्षी सोडता फारसे काही दिसले नाही. तरीही नवीन सगळेच खुप खुश होते. एका वेगळ्याच विश्वात गेल्याचे चित्र त्यांच्या चेहर्यांवर स्पष्ट जाणवत होते.
एका ठीकाणी मातीत बिबळ्या वाघाचे काही ठसे उमटले होते. ते मी सगळ्यांना दाखविले. ते ठसे ताजे आहेत, कदाचित आदल्या रात्रीचेच असतील, असे म्हणताच वातावरण एकदम गंभीर झाले. तेवढ्यात भैया म्हणाला इकडे कसला तरी वास येतोय. मी जवळ जाऊन डोकावताच भपकन उग्र दर्प नाकात घुसला तो दर्प बिबळ्या वाघाच्या मुत्राचा होता. स्वारी सकाळ सकाळीच आपली हद्द निश्चित करून गेली असावी.
त्या वर्षी कारवी ही दर सात-आठ वर्षांनंतर फुलणारी वनस्पती राधानगरीत मोठ्याप्रमाणात फुलली होती. पुर्ण वाढ झालेली कारवी काही ठिकाणी दहा बारा फुटांपर्यत उंच आणि मनगटा एवढी जाडजूड वाढली होती. सगळीकडे कारवीच्या फुलांचा घमघमाट आणि त्या फुलांवर आलेल्या असंख्य मधमाश्यांचा गुंजारव हवेत भरून राहिला होता. कारवीचा मध हा थोडा कडवट आणि जांभळट रंगाचा पण अतिशय औषधीय असतो.
जंगलात एका ओहोळात थोडेफार पाणी वाहात होते, तेथे बसून जवळपास असलेला थोडासा शिधा संपवला, झर्याचे थंडगार पाणी पिऊन थोडीफार विश्रांति घेऊन पुढे निघालो.
जंगलात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. दाजीपूर चे जंगल हे काही सपाट मैदान नाही. असंख्य लहान लहान दर्याखोर्यांनी भरलेले, चढ-उतार असलेले हे जंगल एक गुढच आहे. याठीकाणी नवख्या कोणालाच वाटा सापडने शक्य नाही. अगदी नेहमी जाणारे सुद्धा बरेचदा फसतात, चुकतात. दरवर्षी पावसाळ्यानंतर जुन्या वाटा मुजतात आणि नवीनच वाटा तयार झालेल्या असतात. प्राण्यांनी अनेक नवनवीन वाटा तयार केलेल्या असतात. त्यामुळे अगदी निष्णात लोक पण गोंधळून जाऊ शकतात. जंगलात सतत वर खाली चढाई व उतरून माणूस थकून जातो एव्हाना दुपारचे तीन वाजले होते. अंधार पडण्यापुर्वी जंगलातून बाहेर पडने आवश्यक होते. तसे हे जंगल माझे नेहमीचे आणि पायाखालील असल्यामुळे मी बिनधास्त होतो. दोन तासात जंगलातून बाहेर पडू या अंदाजात परतीची वाट धरली. थोड्याच वेळात आम्ही घनदाट जंगलातून बाहेर पडून थोडेफार कमी दाट जंगलात आलो. तेथे कारवी हीच वनस्पती मोठ्याप्रमाणात होती या झुडपांमधून असंख्य पायवाटा होत्या त्यापैकी बर्याच वन्य प्राण्यांच्या होत्या. मी नेहमीची वाट धरली. तासभर चालल्या नंतर माझ्या लक्षात आले की आपल काहीतरी चुकतय. आपण एकाच ठिकाणी वारंवार परत येतोय. मी कोणालाच काहीएक न बोलता मोठ्या सावधतेने पुन्हा परतीचा रस्ता धरला. वीस-पंचवीस मिनिटात पुन्हा जेथुन सुरवात केली होती तेथेच परत आलो. मला मोठे आश्चर्य वाटले. मी मग त्या ठिकाणी एक काठी रोवली आणखीन त्या काठीच्या समोरून जंगलात घुसलो. अर्ध्या तासात पुन्हा त्याच ठिकाणी परतलो. आता मात्र मी थोडा गांगरलो. सोबतच्यांना म्हटलो बहुतेक आपण रस्ता चुकलोय पण काळजी करू नका लवकरच बाहेर पडू.
मग मी त्या काठीच्या 90° वर दुसरी काठी रोवली आणि पुढे जंगलात घुसलो. परत तेच वीसएक मिनिटात पुन्हा त्याच ठीकाणी परतलो. आता आश्चर्याची जागा चिंता घेऊ लागली, चेहर्यांवर हे अजिबात न दाखवता तिसरी काठी विरूद्ध दिशेला रोवली आणि त्यापुढे पुन्हा जंगलात घुसलो. आता आम्ही थकलो होतो. मला गोंधळून गेलेला बघून सगळेच चिंतित झाले. बारक्याचा चेहरा रडवेला झाला होता. खायला काहीच शिल्लक नव्हते, पाणी देखील संपत आले होते जवळपास साडेपाच वाजले होते अजून अर्धा तासच उजेड राहणार होता. लवकर लवकर बाहेर पडायला हवे होते.
वीस पंचवीस मिनिटात पुन्हा त्याच ठिकाणी दत्त म्हणून हजर झालो. आता मात्र माझी तंतरली. तसा मी जंगलात अर्ध्या रात्री सुद्धा फिरतो, पण ही वेळच विलक्षण होती खोचलेल्या तीन काठ्या बघून सगळे गळपटलेच, पिंट्या तर रडायलाच लागला.
त्याला धीर देत देत मी चौथ्या दिशेला काठी रोवली आणि देवाचे नाव घेत सुसाट घुसलो जंगलात. आता आमची पावले आपोआपच पडत होती, कोणीच एकमेकांशी बोलत नव्हत. समोर दिसेल त्या वाटेने घुसत होतो पुन्हा तेच वीस-एक मिनिटात परत तीच जागा आणि चार काठ्या बघून डोक धरून मटकन खाली बसलो.
कैक वेळा पायाखालून गेलेले जंगल अशी फिरकी घेईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हत. आता अंधार पडु लागला होता झटपट निर्णय घेणे आवश्यक होते बारक्याने रडून रडून गोंधळ घातला होता. बबनराव तर फारच घाबरले होते. भैया पण गांगरला होता. मग मी त्यांना तेथेच बसवून एकटाच जंगलात घुसायचा धाडशी निर्णय घेतला. माझा हा निर्णय कोणालाच पटला नव्हता. उलट ते जास्तच धास्तावले. इथून अजिबात हलायचे नाही अशी तंबी देऊन मी जंगलात घुसलो. फार लांब जाऊ शकत नव्हतो. हाकेच्या अंतरावर जाऊन परत फिरायचो. असे दोन दिशांना जाऊन आलो, काहीच कळत आणि सुचतही नव्हत. शेवटी तिसरा रस्ता धरला आणि अगदी नाका समोर बघून घोड्याच्या डोळ्यांना झापं लावतात तसे समजून अगदी सरळ झाडी झुडपे तुडवत जंगलात घुसत गेलो आणि काय आश्चर्य अवघ्या हाकेच्या अंतरावर जंगलातील नेहमीच्या कच्च्या गाडी रस्त्यावर आलो. युरेका युरेका असे आर्कीमिडीझ् सारखे ओरडावेसे वाटत होते तेथूनच ओरडून सांगितल रस्ता सापडलाय, आलोच. पटापट माघारी आलो आणि सगळ्यांना घेऊन रस्त्यावर आलो. अंधार वाढतच होता, अगदी थोडक्यात वाचलो होतो न जानो पुढे काय घडले असते? याची कल्पनाच करवत नव्हती.
रस्त्यावर पोहोचताच सर्वांच्या जीवात जीव आला. मग झपाझप पावले टाकत परतीची वाट धरली. लवकरच मुख्य डांबरी रस्त्यावर आलो आता पुरता अंधार पडला होता. गाडी लावलेले घर अजूनही लांबवर होते. अंगात त्राण उरले नव्हत पण हिम्मती ने पावले उचलत अंधारातच अंदाजाने रस्ता कापत कापत जागेवर पोहोचलो. तेथे आमचे स्नेही देखील चिंतेत होते म्हटले अजून अर्धा तास वाट बघून तुम्हाला शोधायला लवाजमाच घेऊन येणार होतो.
गटागटा पोटभर पाणी प्यायलो आणि निकराने त्यांचा जेवणाचा आग्रह मोडून परतीचा मार्ग धरला.
राधानगरीत पोहोचल्यावर थोडेफार अल्पोपहार करून थेट कोल्हापूरचा मार्ग धरला.
फारूक म्हेतर
कोल्हापूर

Comments
Post a Comment