Posts

Climate Change

Climate Change ' नेमिची  येतो  मग  पावसाळा ...' वर्षानुवर्षे ऋतूमागून ऋतू येतात आणि जातात. दरवर्षी पावसाचे आगमन होते. कधी तो लवकर येतो तर कधी उशिरा! एकंदरीतच वरील ओळीतून आपल्याला हा अर्थ बोध होतो. या वर्षी जुन महिन्यात प्रत्येक आठवड्यात एकदा तरी जंगलात जाणे झालेच.  तसे ते दरवर्षी होतेच परंतू करोना मुळे गेल्या दोन-तीन वर्षात या मधे खंड पडला होता. जूनचा पहिला आठवडा पहिल्या आठवड्यात जंगलात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.  पक्षी आपापल्या जोड्या जमवण्यात मग्न होते, त्यांच्या मधुर कोर्टशीप काॅल्सनी आसमंत भरून गेला होता.  सुंदर सुंदर फुलपाखरे नुकतीच कोशातून बाहेर पडून जोडीदाराच्या शोधात भिरभिरत होती.  जंगलात बहुतांश ठीकाणी उतारावर, मोकळ्या रानात कारवी ही दर सात-आठ वर्षांनंतर फुलणारी झुडपी वनस्पती भरपूर प्रमाणात होती.  ती मार्च पासूनच पूर्णपणे निष्पर्ण झाली होती. खुपश्या झाडा झुडपांना मोहक पालवी फुटत होती.  जंगल सरड्यांच्या नरांना गळ्या भोवती भड़क रंग आले होते व  त्यांची मादीला रिझवण्यासाठी पळापळी, द्वंद युद्ध सुरू होते....

घाट रस्ते आणि पुल

"घाट रस्ते आणि पुल" सह्याद्रि म्हणजेच पश्चिम घाट हा जैवविविधतेने नटलेला,बहरलेला प्रदेश आहे.  या पश्चिम घाटातील जंगलात असंख्य प्राणी, वनस्पती, किटक, मासे, पक्षी, फुलपाखरे इ वन्यजीवांची रेलचेल असते.  या पैकी अनेक वन्यजीव हे प्रदेशानिष्ठ आहेत, म्हणजेच ते फक्त आणि फक्त पश्चिम घाटातच आढळतात.  जगात इतरत्र कोठेही आढळून येत नाहीत. म्हणूनच या पश्चिम घाटाला जागतिक मेगा बायोडायव्हर्सीटी हाॅट स्पाॅट चा दर्जा दिला गेला आहे. तसेच हा जागतिक वारसा स्थळ म्हणून पण प्रसिद्ध आहेच. अश्या या पश्चिम घाट पार करायला अनेक घाट रस्ते तयार करण्यात आले आहेत. तर अजून बरेच नवीन घाट रस्ते प्रस्तावित आहेत.  हे घाट रस्ते पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण यांना जोडतात.  हा प्रदेश उंच आणि डोंगर दर्यांनी भरलेला असल्याने तेथे घनदाट जंगल आहे.  या ठिकाणी पर्जन्यमान देखील जास्त असते.  अति वृष्टि तर नेहमीच होत असते.  हे घाट रस्ते बनविताना आडव्या येणाऱ्या प्रत्येक ओढ्यावर, नाल्यावर पुल बनविले आहेत.  परंतु हे पुल बांधते वेळी या ओढ्यांना पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचा कोणताही अभ्यास न करता नळे...

बर्ड मॅन ऑफ इंडिया - डाॅ सालिम अली

बर्ड मॅन ऑफ इंडिया  - डाॅ सालिम अली .. 12 नोव्हेंबर 1896 रोजी मुंबई येथे बोहरा कुटुंबात त्यांचा जन्‍म झाला.. जन्‍मानंतर वर्षभरातच वडील मोईजुद्दीन यांचे निधन झाले  आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी आई झिनत उल निस्सा चेही निधन झाले.. आणि ते अल्प वयातच अनाथ झाले. त्यांचा मुक्काम कधी मामाकडं तर कधी काकीकडं हलला.. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी छर्याच्या बंदुकीने एका चिमणीची शिकार केली. जेव्हा त्यांनी ती चिमणी उचलली तेव्हा तिचा कंठ पिवळा असल्याचे दिसले. हे काही तरी वेगळेच आहे हे लक्ष्यात आल्यावर कुतूहल पूर्वक त्यांनी ती चिमणी मामा amiruddin यांना दाखवली. हे मामा वाईल्‍ड लाईफ सोसायटी अन् बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटीचे सदस्य होते.. मामा त्यांना घेऊन BNHS येथे घेऊन गेले तेथे तत्कालीन मानद सचिव W S मीलार्ड यांनी सालिम अलीं चा इंटरेस्ट बघून त्यांना BNHS मधील पेंढा भरून ठेवलेले असंख्य पक्षी दाखवले.  ते पाहून सालिम अली पूर्णपणे भारावून गेले.  तो एक क्षण होता ज्यानं त्यांचं आख्खं आयुष्यच बदलवून टाकलं.. त्यांना पक्ष्यांचा नादच लागला.. इतका की त्यांनी आपलं पुढील सर्व आयुष्य पक्ष...

पहिला धडा - निसर्ग ज्ञान

#JungleVibes पहिला धडा  - निसर्ग ज्ञान सांगली जिल्ह्यातील तासगाव आमचे मुळ गाव, तेथे आमचे वडलोपार्जित शेत होते. लहानपणी आम्ही दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शेतात जात असु, माझे काका काकी तेथेच रहात असत. फार सुंदर असे शेत होते आमचे !  त्यात मका, ज्वारी, गहू, हरभरा, ऊस इ पीके निघत शिवाय केळी, सिताफळ, रामफळ, कवठ यासारखी फळझाडे पण खुप होती. शेजारील शेतात द्राक्षाचे मळे होते. घरासमोरील जागेत वांगी, टोमॅटो, पावटा, अंबाडी, मेथी, गवारी, पोकळा इत्यादी भाजीपाला पिकत असे. तेथे आमचे एक तीनपाकी दगडी कौलारू घर होते.  घराजवळच छोटेसे खळे होते आणि घरामागे बांधीव विहीर होती. विहीरवर रहाट होती.  तेथे दुष्काळ पाचवीलाच पुजला असल्याने उन्हाळ्यात विहीर पुर्णपणे आटायची पण दिवाळीच्या दरम्यान हमखास टम्म भरलेली असायची. विहीरीवर बसवलेल्या पंपाचे पाणी पाटाने संपुर्ण शेतात फिरवले होते.  त्या थंडगार पाण्यात पाय सोडून बसणे स्वर्गीय आनंद द्यायचे. घरावर हमखास दुधी भोपळ्याचा वेल सोडलेला असे, फार चवीष्ट लागायची त्या दुधीची भाजी. अंगणातच काही लिंबू, इडलिंबू, शेवगा, पेरू, कढीपत्त्याची झाडे हो...

जंगल, चकवा आणि वाघ

जंगल, चकवा आणि वाघ           साधारणत साल 2006 मधील घटना असेल मी त्याकाळात दाजीपूर अभयारण्यात वरचेवर जात असे अभयारण्यातील चप्पा चप्पा फिरलोय मी.  दरवर्षी प्राणी गणना उपक्रमात सहभागी होने हा माझा नियमित कार्यक्रम असायचा.  बुद्ध पोर्णिमेला मचाणावर बसून प्राणी गणना करने म्हणजे एक पर्वणीच असायची.  अभयारण्यातील मोक्याच्या मचाणावर बसण्यासाठी मी नेहमीच विषेश प्रयत्न करत असे.  वन्यजीव विभाग मधील अनेक कर्मचारी ओळखीचे असल्याचा हा फायदा होता.           एकदा असाच नेहमीप्रमाणे बुद्ध पोर्णिमेला वन्यजीव विभागच्या ऑफिसवर तोंडी कल्पना देऊन दाजीपूर मधील भोपळीची सरी नाव असलेल्या ठिकाणी बनवलेल्या मचाणावर प्राणी गणनेसाठी जाऊन बसलो.  दुपारी बारा वाजता मचाणावर चढलो आणि लवकरच सेट होऊन प्राण्याची चाहुल घेत बसलो. दुपारी भेकराची एक जोडी पाणी पिऊन गेली.  सायंकाळी पाच वाजता पाठीमागून खसखस आवाज येऊ लागला.  तसे कान टवकारून डोळे फाडून त्या दिशेस बघू लागलो.  आवाज वाढतच गेला तशी आमची उत्कंठा...

जंगल आणि चकवा

जंगल आणि चकवा साधारणत वीस-एक वर्षा पुर्वीची गोष्ट असेल, त्यावेळी आमचे टू व्हीलर स्पेअर पार्ट्स किरकोळ विक्री चे दुकान होते.  वेळ मिळेल तेव्हा मी जंगलात फिरायला जात असे.  बहुतांश वेळा प्रत्येक सोमवार ठरलेलाच असे, कारण तो आमचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असे. दाजीपूर, आंबा, चांदोली, बर्की, सागरेश्वर इ अनेक जंगल अक्षरशः पालथे घातले या काळात.  माझा हा शौक अनेक मिस्त्री लोकांना माहित होता त्यापैकी बरेच जण नेहमीच मला आपल्या सोबत घेऊन जा अशी विनंती करत असत.  परंतू मी हसून दुर्लक्ष करे. पण एक मिस्त्री होते बबनराव!  त्यांनी माझा चांगलाच पाठपुरावा केला, शांत सुस्वभावी व आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक असे बबनराव माझे खुप चांगले मित्र आहेत. प्रत्येक मंगळवारी मला विचारायचे काल कोठे गेला होता? काय काय बघितले?  दुकान शेजारील हाॅटेल मधे चहाचे झुरके घेत घेत मी पण त्यांना सगळे सविस्तर सांगायचो.  अनेकदा त्यांच्या सोबत योगेश (बारक्या) हा त्यांचा किडकिडीत हेल्पर पण असायचा. तो तर आमचे हे संभाषण गुंग होऊन ऐकायचा.  चहाचे बिल मीच देणार या वादात ते मला नेहमी बोलायचे फारूक-अ...

जंगलाचे आरोग्य

जंगलाचे आरोग्य खुप वर्षांपासून जंगलात जाण्याचा योग आला नव्हता.  जबर इच्छा होती जंगलात चालत फिरायची.  मग काय लावला फोन धनंजयला म्हटल "जंगलात जाऊया चल " तर लगेच तयार झाला म्हटला  "या सोमवारी जाऊया " कामाच्या नादात मी विसरून गेलो पण रविवारी मॅच संपल्यावर पठ्ठ्याचा फोन "ऊद्या जायच नव्ह? " मी जरा उदासीचेच बोललो "बघू" तर म्हणतय कसा "मी आणखीन दोघांना तयार केलय जर तुम्ही कॅन्सल केल तर तुम्हाला आमच्या संपूर्ण ट्रीपचा खर्च द्यावा लागेल."  मी पैश्याला तसा मुलखाचा चिकट नाईलाजाने म्हटल "येतो उद्या" सोमवारी सकाळीच तीघे जण दारात गाडी घेऊन हजर, मी विचारल्यावर धनंजय बोलला मुडागडला जायचय. तस मी घाबरतच म्हटल फार चालाव तर लागणार नाही ना? तसा धनंजय बोलला बसा गाडीत दोन-तीन तासाचा ट्रेक आहे, थोडीफार चढाई आहे पण जंगल मस्त आहे. मी शुज चढवून गुमान बसलो गाडीत.  मजल दरमजल करत बाजारभोगाव मधे पोहोचलो.  तेथे 'गुडलक सोन्या' या नावाचे एक छोटेखानी हाॅटेल आहे.  गेली 25 वर्ष तेथे अल्पोपहार करतोय वडापाव, मिर्ची भजी, मिसळ, कटवडा, कांदापोहे, शिरा.  सगळे...