घाट रस्ते आणि पुल
"घाट रस्ते आणि पुल"
सह्याद्रि म्हणजेच पश्चिम घाट हा जैवविविधतेने नटलेला,बहरलेला प्रदेश आहे. या पश्चिम घाटातील जंगलात असंख्य प्राणी, वनस्पती, किटक, मासे, पक्षी, फुलपाखरे इ वन्यजीवांची रेलचेल असते. या पैकी अनेक वन्यजीव हे प्रदेशानिष्ठ आहेत, म्हणजेच ते फक्त आणि फक्त पश्चिम घाटातच आढळतात. जगात इतरत्र कोठेही आढळून येत नाहीत. म्हणूनच या पश्चिम घाटाला जागतिक मेगा बायोडायव्हर्सीटी हाॅट स्पाॅट चा दर्जा दिला गेला आहे. तसेच हा जागतिक वारसा स्थळ म्हणून पण प्रसिद्ध आहेच.
अश्या या पश्चिम घाट पार करायला अनेक घाट रस्ते तयार करण्यात आले आहेत. तर अजून बरेच नवीन घाट रस्ते प्रस्तावित आहेत. हे घाट रस्ते पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण यांना जोडतात. हा प्रदेश उंच आणि डोंगर दर्यांनी भरलेला असल्याने तेथे घनदाट जंगल आहे. या ठिकाणी पर्जन्यमान देखील जास्त असते. अति वृष्टि तर नेहमीच होत असते. हे घाट रस्ते बनविताना आडव्या येणाऱ्या प्रत्येक ओढ्यावर, नाल्यावर पुल बनविले आहेत. परंतु हे पुल बांधते वेळी या ओढ्यांना पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचा कोणताही अभ्यास न करता नळे वापरून पुल बांधले आहेत. बहुतांश ठिकाणी तर हे नळे खुपच लहान लहान बसविलेले आहेत. खरतर यांना पुल म्हणणेच चुकीचे आहे, मुळच्या नैसर्गिक ओढ्यात दगड मातीची भर घालून त्यात आडवे नळे टाकून पुन्हा त्यावर दगड माती टाकून त्यावर रस्ता तयार करण्यात येतो. हा पुल नसुन एक प्रकारचा बंधाराच असतो.
पावसाळ्यात जेव्हा घाट माथ्यावर मुसुळधार पाऊस पडतो तेव्हा या ओढ्यांना प्रचंड पाणी येते. अश्या वेळेस हे नळे पाणी वाहून न्ह्यायला अपुरे पडतात आणि मग पाण्याचा हा प्रवाह रस्त्यांवरून वाहू लागतो.
तसेच या नळांच्या तोंडावर जंगलातील वाहून आलेले ओंडके, कचरा, पाला पाचोळा अडकतो व पाण्यास निचरा व्हायला जागाच मिळत नाही मग हा ओढा तुंबतो आणि पाणी रस्त्यांवरून वाहू लागते.
या वरील दोन्ही प्रकारात या रस्त्यांवरील पुलांवर पाण्याचा प्रचंड दबाव येतो आणि रस्ता किंवा पुल वाहून जाण्याचा धोका निर्माण होतो, तसेच हे पुल फार लवकर कमकुवत होतात.
अश्या तुंबलेल्या ओढ्यांचे पाणी पुलांवरून रस्त्यांवर आल्याने घाट रस्ते बंद पडल्याच्या घटना तर खूप घडताहेत. या रस्त्यांवरून वाहनार्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचतात किंवा वाहून जातात. अलीकडे घाटात दरडी कोसळून घाट बंद होण्याचे जे प्रकार वाढत आहेत ते या प्रकारच्या पुलांमुळे.
अश्या रस्त्यांवर जबरदस्तीने वाहणे चालवण्याने गाड्या वाहून दरीत कोसळल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.
घाटात नेहमीच एका बाजूला उंच कडा तर दुसऱ्या बाजूस खोल दरी असते. घाटमाथ्यावरील पाणी जेव्हा या कड्यांवरून खाली दरीत कोसळते तेव्हा त्यास प्रचंड ओढ आणि जोर असतो. असे हे फेसाळत येणारे पाणीच आपल्याला धबधब्याच्या स्वरूपात दिसतात.
अनेक घाट रस्ते घनदाट जंगलाच्या बरोब्बर मधून जातात आणि ते या जंगलाचे दोन भाग करतात. वन्य प्राणी या दोन्ही क्षेत्रा दरम्यान नेहमीच ये-जा करत असतात. या मध्ये गवे-वाघा सारखे मोठे वन्यजीव तर आहेतच पण असंख्य लहान लहान प्राणी, सरीसृप, उभयचर, किटक सुद्धा ये-जा करतात. यातील काही रस्त्यांवर वाहतुकही जास्त असते. त्यामुळे या सर्व जीवांना हा रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते यावेळी बर्याच जीवांना आपला जीव गमवावा लागतोय.
दरवर्षी या रस्त्यांवर पावसाळ्यात आणि नंतर लगेचच हिवाळ्यात शेकडो प्रजातींचे असंख्य लहान मोठे जीव वाहनांखाली चिरडले जातात व मृत्युमुखी पडतात. यात प्रामुख्याने साप, बेडूक, किटक यांचा समावेश असतो. वाहनांच्या धडकेने गवा, सांबर, साळींदर इ वन्यप्राणी देखील जखमी वा मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी आहेत.
बरेच ठिकाणी नळे हे ओढ्याच्या तळापासून खुप उंचावर घातलेले आहेत जे अत्यंत चुकीचे आहे.
घाटातील या पुलांखालून वन्यजीवांना नळे लहान लहान आणि उंचावर असल्यामुळे इकडून तिकडे जाता येत नाही. नाईलाज म्हणून मग हे जीव रस्त्यांवर येतात आणि अपघातात मृत्युमुखी पडतात.
घाट रस्त्यांवरील ओढ्यांवर पुल हे नेहमीच कमान (Arch) असलेले बनविले पाहिजेत. एकतर हे पुल खुप मजबूत असतात आणि या पुलांखालून पाणी सहजपणे निघून जाते. पुर्वीच्या काळातील सर्व पुल असेच कमानींचे असायचे परंतू नळे घालून पुल बाधने खुप सोपे आणि कमी खर्चीक असल्याने आता सर्रास नळे घालूनच पुल तयार करतात.
परंतु याचा फटका दरवर्षी पावसाळ्यात घाट रस्त्यांना बसतोय. कित्येकदा पाणी तुंबून रस्त्यांवरून वाहू लागते आणि वाहतुक बंद करावी लागते. यात फार मोठे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु लोकांच्या जिवीताला पण धोका निर्माण होतो. अनेक गावांचा संपर्क तुटतो.
त्यामुळे या पुढे नवीन सर्व पुल आर्क पद्धतीने बांधावेत नळे बिल्कुल घालू नयेत. आर्क पद्धतीने बांधलेल्या पुलांखालून पावसाळ्यात पाणी विना अडथळा वाहून जाते.
पावसाळ्यात अनेक प्रजातींचे मासे, इल मासे, खेकडे, कासव इ इ या ओढ्यातून वरच्या भागात प्रजननासाठी येतात. त्याच प्रमाणे सिसीलीयन सारखे उभयचर, असंख्य बेडूक या ओढ्यांचा वापर करत असतात. जर या ओढ्यांत नळे घातले गेले तर या जीवांच्या प्रजनन काळातील स्थलांतर मार्गात अडथळा निर्माण होऊन अनेक माशांच्या प्रजाती या नामशेष होतील तसेच त्यांच्या संखेत मोठी घट होईल.
तसेच या आर्क पद्धतीच्या पुलांखालून पावसाळा वगळता इतर सर्व ऋतुं मधे जेव्हा यातील बहुतांश ओढे कोरडे पडतात तेव्हा अनेक वन्यजीव अगदी वाघ-गवे सारखे मोठे प्राणी देखील सहजा सहजी रस्त्याच्या दोन्ही बाजूस बिनधास्त ये-जा करू शकतील. त्यांना विनाकारण रस्त्यांवर येऊन जीव धोक्यात घालावा लागणार नाही.
वन विभागाने तर त्याच्या हद्दीतील ओढ्यांवर आर्क पद्धतीचेच पुल बांधण्याचा आग्रह करावा किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभर जेथे जेथे वन विभागाच्या हद्दीतील ओढ्यांवर पुल बांधण्याबाबत प्रस्ताव असेल तेथे तेथे आर्क पद्धतीचेच पुल मंजुर करावेत अन्यथा त्यास परवानगी बिल्कुल देऊ नये.
आर्क पद्धतीचे पुल बांधने खुपच अशक्य असलेस जे नळे घालण्यात येणार आहेत ते खुप मोठे असावेत. आणखीन ते नळे ओढ्यात अगदी तळाशी घालण्यात यावेत जेणेकरून पाणी विना अडथळा वाहत राहिल व मासे व इतर वन्यजीवांच्या प्रवासात काहीही अडचण येणार नाही.
सद्या ज्या ज्या ठिकाणी नळे घातलेल्या पुलांवर पाणी येते तेथे तातडीने कमान पद्धतीचे पुल बांधण्याबाबत विचार करायलाच हवा किंबहुना तसे बाधलेच पाहिजेत.
हजारों-हजार कोटी रूपये खर्च करून रस्ते करण्याचे काम करत असता भविष्याचा विचार करून काही कोटी रूपये अश्या कमानस्वरूपी पुल बांधायला खर्च पडले तर काय हरकत आहे. उलटपक्षी भविष्यात ते उपयोगीच पडतील.
वरील सर्व बाबींचा विचार करता मी वन विभागाला आणि रस्ता बांधकाम विभागास विनंती करतो की त्यांनी या बाबतीत गांभीर्याने विचार-विमर्श करावा आणि योग्य ती पाऊले उचलावीत जेणेकरून भविष्यात होणाऱ्या वन्यजीवांच्या हत्या कमी होतील.
सर्व निसर्गप्रेमींना मी आवाहन करतो की त्यांनी देखील आपापल्या परीने यात लक्ष घालावे आणि योग्यतम कामासाठी पाठपुरावा करावा.
फारूक म्हेतर
वन्यजीव अभ्यासक कोल्हापुर
9028816060

घाट रस्ते हे होणारच, आपण या महत्वकांक्षेला आता रोखूच शकत नाही आणि ना ही हे भुत गाडू शकतो
आता विरोध करून काहीएक फायदा नाही
पण आपली ताकद विरोधात घालवण्या पेक्षा जर आपण काही पर्याय, काही सुचना दिल्या आणि त्यावर ठाम राहिलो तर त्यातून काही चांगल्या गोष्टी घडवून आणू शकु
1 चागले लाबलचक अंडर आणि ओव्हर पास
2 जंगलातील घाट रस्त्यात स्पीड लिमीट
3 जंगलातील ओढ्यावर जे पुल असतील ते आर्च पद्धतिने बांधने, नळे अजिबात नको
इ इ
अजून बर्याच सुचना करून पाठपुरावा करने योग्य राहील 😊

Comments
Post a Comment