महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways
महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways अग्निपथ या फिल्म मधील व्हीलन डॅनी हिरो बच्चनला मारायचा आटोकाट प्रयत्न करतो पण बच्चन तो हाणून पाडतो. मग डॅनी बच्चनला घरी वाटाघाटी साठी बोलावतो. त्यावेळी त्याचे चमचे आश्चर्यचकित होऊन डॅनीला याचे कारण विचारतात. तेव्हा डॅनी एक बढिया आणि फेमस डायलॉग मारतो. "जब दुश्मन की उम्र बढ जाए तो उससे दोस्ती कर लेनी चाहिए, अपनी उम्र बढ जाती है। " यालाच मराठीत शब्द आहेत 'यशस्वी माघार ' हिंदीत 'सर सलामत तो पगडी पचास' अगदी शब्दशः नाही तरी बर्याच प्रमाणात आजकालच्या घडामोडींना हा डायलॉग लागू पडतोय. आज विकास त्याच्या परम सीमेवर आहे. तो अंधाधुंद ओसंडून वाहतोय. मोठमोठ्या फैक्ट्री, रिफायनरीज, खाणकाम, महामार्ग इ. इ. आपला आजचा विषय आहे 'रस्ता' (महामार्ग) चौपदरी, सहापदरी, अष्टपदरी असे महाकाय रस्ते अक्राळ विक्राळ पणे सगळीकडेच चौफेर बनत चाललेत. गरज असो वा नसो, लोकांची मागणी असो वा नसो, दोन-दोन पर्यायी मार्ग असून देखील धडाधड नवे महामार्ग मंजूर होताहेत आणि ते मार्गीही लागताहेत. यात घरे, दुकाने, व्यवसाय, शेती, जं...