कारवी' एक नैसर्गिक चमत्कार
'कारवी' एक नैसर्गिक चमत्कार
कारवी ही वनस्पती जगतातील Acanthaceae या फॅमिलीतील Strobilanthes या जीनस मधील वनस्पती आहे. Strobilanthes हे नाव Srtobilos म्हणजे कोन आणि Anthos म्हणजे फुल या लॅटीन शब्दांपासून बनले आहे, याचा शब्दशः अर्थ 'कोनफुल' असा होतो. मुळ आशिया खंड आणि मादागास्कर येथे आढळून येणाऱ्या या वनस्पतींना दिर्घ काळानंतर (1 वर्ष ते 16 वर्ष) फुले येतात. Strobilanthes या जीनस मधे साधारणत 450 प्रजाती आढळतात, पैकी भारतात 148 प्रजाती आहेत. त्यातील 72 प्रजातीं या प्रदेशानिष्ठ आहेत. प्रामुख्याने पश्चिम घाट आणि पुर्वांचल हिमालय मधे आढळतात. भारतीय द्वीपकल्पात जवळपास 60 प्रजातीं आढळून आलेल्या आहेत. पैकी 48 प्रजाती या प्रदेशानिष्ठ आहेत.
दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत रांगाचे नाव हे याच वनस्पतीवरून ठेवले आहे. Strobilanthes kunthianus नीलकुरूंजी असे स्थानीय नाव असलेली ही वनस्पती दर 12 वर्षांनंतर मोठ्याप्रमाणात फुलते व ही संपूर्ण पर्वतरांग निळीशार होऊन जाते.
कारवी प्रजातींतील वनस्पती या झुडप वर्गीय असून त्यांची वाढ प्रजातीनुसार 2 फुट ते 8-9 फुटांपर्यत असू शकते. या वनस्पतींचे आयुष्य प्रजातीं नुसार 2 ते 16 वर्षापर्यंत असते. त्यानंतर या वनस्पतींना एकाच वेळी मोठ्याप्रमाणात फुले येतात. एखाद्या प्रदेशातील एकाच वनस्पती प्रजातीच्या सर्व वनस्पतींना एकाच वेळी फुले येण्याच्या प्रकाराला Gregarious Flowering वा Mass Flowering असे म्हटले जाते. वनस्पती जगतात बांबू वर्गीय प्रजातीं मधे सुद्धा ही प्रक्रिया आढळून येते.
आपल्या आयुष्य भराची ताकद पणाला लावून ही वनस्पती फुलते, खुपश्या बिया तयार करते व मरून जाते. म्हणजेच या वनस्पतीला आयुष्यात फक्त एकदाच प्रजनन करण्याची संधी मिळते. यासाठी या वनस्पती खुप सुंदर अशी मकरंद युक्त अशी भरपूर फुले तयार करतात. Mass Flowering या प्रक्रिये मागील गृहितक (Hypothesis) पुढील प्रमाणे असावीत.
1) असंख्य बिया तयार झाल्यामुळे खुपश्या बिया जरी परभक्षींच्या आहारी पडल्या तरी अनेक बिया शिल्लक राहून पुढील पिढी सुनिश्चित होते.
2) Mass Flowering मुळे असंख्य किटक या प्रदेशात आकर्षित होऊन पर-परागीभवन (Cross Pollination) होते व पुढील पिढी अधिक सुदृढ निपजते.
3) या प्रक्रीयेत ही वनस्पती इतर वनस्पतीवर आपले अधिपत्य स्थापित करते आणि त्या प्रदेशातून इतर वनस्पती समुळ नष्ट करते.
कारवीच्या प्रजाती 7-12 वर्षांनंतर जरी मोठ्याप्रमाणात फुलत असल्या तरी त्या प्रजातींतील काही झाडे केव्हाही तुरळक प्रमाणात फुलतात याला Sproradic Flowering असे म्हटले जाते.
महाराष्ट्रातील पश्चिम घाट म्हणजेच उत्तर पश्चिम घाटातील (सह्याद्रि) प्रदेशात Strobilanthes Callous कारवी,
Strobilanthes heyneanus बकरा कारवी,
Strobilanthes lupulina बकरा कारवी
Strobilanthes sessilis (Pleocaulus ritchei) - माळ कारवी/टोपली कारवी,
या प्रमुख चार प्रजाती आढळतात. ज्या दर तीन ते बारा वर्षांनंतर फुलांवर येतात.
वरील पैकी पहिल्या तीन प्रजाती या प्रामुख्याने डोंगरांचे उतार, जंगलातील खुले प्रदेश, रानवाटा आणखीन जंगलाच्या लगतच्या भागात आढळतात. काही ठिकाणी तर या तिन्ही प्रजातीं जवळजवळ आढळतात. काही ठिकाणी दरवर्षी फुलांवर येणारी कारवी प्रजात पण उगवतात.

परंतू Strobilanthes sessilis
(Pleocaulus ritchei) - माळ कारवी, टोपली कारवी ही वनस्पती मात्र अति उंचावरील सड्यांवर, डोंगर उतारावरच आढळून येते.
ही कारवी एखाद्या उलट्या झाकलेल्या टोपली प्रमाणे दिसते. या वनस्पतीची उंची दोन फुटच असते पण जेव्हा तिला फुलोरा येतो तेव्हा फुलांचे ताटवे अगदी चार फुटांपर्यत वाढतात. परिसरातील सर्व कारवी एकाच वेळी फुलते.
Strobilanthes scrobiculata - ही एक दुर्मिळ कारवीची प्रजात जी 16 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर फुलांवर येणारी आणि अति उंच ठिकाणी असलेल्या धबधब्यांच्या उतारावरच आढळून येणारी वनस्पती 2022 साली आंबोलीत फुलांवर आली होती.
ही कारवी 800 ते 1200 मीटर उंचीवरच आढळून येते. या कारवीची नोंद कर्नाटक आणि महाराष्ट्रातच झाली आहे.
Strobilanthes Callous कारवी ही दर सात ते आठ वर्षांनंतर फुलांवर येणारी प्रजात उत्तर पश्चिम घाटात सर्वात जास्त प्रमाणात आढळून येते.
Strobilanthes Callous ही कारवी आपल्याकडे आढळून येणाऱ्या कारवी प्रजातींतील सर्वात उंच वाढणारी प्रमुख प्रजात आहे. साधारणत 8-9 फुटांपर्यत व मनगटा एवढी जाड होणारी ही वनस्पती बहुउद्देशीय आहे. पुर्वीच्या काळातील घरे या वनस्पतीच्या खोडांपासून बनवले जात असत. या वनस्पतीचे खोड एकमेकांत गुंतवून त्यावर चिखल मातीने लिंपून बनविलेल्या भिंतीची घरे फार उपयुक्त असतात. अशी घरे थंडीत उबदार आणि गरमीत थंडगार राहतात. जंगलातील घरांच्या अंगणाचे कुंपन तर अजूनही याचेच बनवतात.
जेव्हा ही वनस्पती फुलते तेव्हा असंख्य मधमाश्या, भुंगे आणि तत्सम किटक या जांभळ्या रंगांच्या फुलांवर घोंघावत असतात. कारवीचा मध फारच औषधीय असतो. थोडासा तुरट असलेला हा मध फक्त या काळातच मिळतो. हे किटकच या फुलांचे परागीभवन करतात. नंतर तेथेच बियां तयार होतात आणि ही वनस्पती मरून जाते. लवकरच ती पूर्णपणे निष्पर्ण होते फक्त बियांच्या शेंगाच शिल्लक राहतात. बिया या शेंगातच जवळपास जुन महिन्यापर्यंत राहतात. आणि पहिल्या पावसात या शेंगा तडकतात व या बियां जंगलात दूरवर फेकल्या जातात. या शेंगांचा तडकण्याचा आवाज फार मोठा असतो. जंगलात लवंगी फटाकड्यांच्या असंख्य माळाच फुटल्या सारखा आवाज होत राहतो. कारवीच्या या बियांची उगवन क्षमता खुप जास्त असते. लवकरच जंगलात जेथे जेथे या बिया पडतात तेथे तेथे पुन्हा कारवीचे घनदाट जंगल तयार होते. या दाटीत इतर कोणतीही वनस्पती तग धरू शकत नाही. पावसाच्या पाण्याबरोबर जेथे जेथे बिया वहात जातात तेथे पण उगवतात. फक्त दाट जंगलातील घनदाट सावली मधे ही कारवी जगू शकत नाही. कारवीच्या या वनात सहजासहजी कोणी घुसू शकत नाही, अगदी गवा देखील नाही.
कारवी ही वनस्पती Celaenorrhinus ambareesa – Dakhan Spotted Flat, Celaenorrhinus fusca – Dusky Spotted Flat, Celaenorrhinus leucocera – Common Spotted Flat, Junonia iphita – Chocolate Pansy, Kallima horsfieldii – Sahyadri Blue Oakleaf या फुलपाखरांची खाद्य वनस्पती आहे.
गवा हा आपल्या जंगलातील भीमकाय प्राणी सुद्धा कारवीचे कोवळी पाने खातो. काही कारवी प्रजाती या सांबर प्राण्याचे खाद्य आहे. परंतु कारवी ही काही गवा या प्राण्याचे मुख्य खाद्य वनस्पती नाही. कारवी हेच गव्यांचे मुख्य खाद्य वनस्पती आहे हा एक कर्णोपकर्णी पसरलेला गैरसमज आहे. गवा अनेक प्रकारचे गवत वर्गीय वनस्पती आणि अनेक प्रकारच्या वेली, वृक्ष यांची पाने, साली, फळे खातो. कारवी या वनस्पतीची संपूर्ण पाने हिवाळ्यात गळून पडतात. पहिल्या पावसात सर्व प्रथम या निष्पर्ण कारवीलाच धुमारे फुटतात. त्या वेळी गव्यांना खायला जंगलात कोणतीच हिरवीगार वनस्पती उपलब्ध नसते. त्यामुळे गवा यावर ताव मारतो, ते ही नेहमीच्या मळलेल्या वाटे वरीलच कारवी खाल्ली जाते. गवा शक्यतो कारवीच्या दाट वनांत घुसून कारवी खात नाही. मध्य भारतातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इ अनेक जंगलात तर कारवी ही वनस्पतीच नगण्य आहे वा अजिबात नाही. तरीही तेथे धष्टपुष्ट गवे आढळून येतात.
निसर्गतः या कारवीचे वसतिस्थान हे डोंगर उतार आणि कडे कपारीत आहेत. तीव्र डोंगर उतारावर कारवीची मुळे जमीनीची धुप थांबवून पाण्यास जमीनीत मुरण्यास मदत करतात. राखीव जंगलात, गायरानात आणि खाजगी जंगलात कारवी ही फक्त डोंगर उतारावर आढळून येते. जंगलातील मोकळ्या प्रदेशात ती फारशी आढळून येत नाही. कारण तेथे मानवी हस्तक्षेप असतो. गावठी जनावरे चराई होत असल्याने तेथील जंगलातील मोकळ्या प्रदेशात चांगलेच गवत उगवते. परंतु अभयारण्य प्रदेशात मानवी हस्तक्षेप पुर्णपणे बंद झाल्यामुळे आणि गुरे चराई पुर्णपणे बंद झाल्यामुळे कारवीच्या गेल्या तीन-चार बहरा नंतर ही कारवी जंगलातील मोकळ्या गवताळ प्रदेशात अक्षरशः माजली आहे. तेथील गवती कुरणे हळूहळू आकसून तेथे आता फक्त आणि फक्त कारवीच वाढतेय. यामुळे जंगलातील गवताळ प्रदेश नष्ट झाले आणि गवे, सांबर इ तृणभक्षक प्राणी आता जंगल सोडून शेतातच धाडी टाकू लागलेत. जंगलातील गवत टंचाई व त्यामुळे वन्यजीवांचा शेतीला वाढता उपद्रव हा आजकाल वनविभागाला मोठा डोक्यास ताप देणारा प्रश्न निर्माण झालाय. गवे, रानडुक्कर तर जंगलात कमी आणि शेतातच जास्त अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण होऊन शेतकरी-वन्यजीव संघर्ष होत आहेत.
मी साधारणत 1995 सालांपासून Strobilanthes Callous कारवी या प्रजातीचा फुलोरा पहात आलोय. सह्याद्रि मधील बहुतांश डोंगर या वनस्पतीने भरलेले आहेत. तदनंतर तीन वेळा ही वनस्पती फुलांवर आलेली होती. आता पुन्हा सात ते आठ वर्षांनंतर काही ठिकाणी 2022 साली, काही ठिकाणी 2023 साली आणि आता 2024 साली अनेक ठिकाणी पुन्हा फुलांवर आली आहे.

Strobilanthes Callous या कारवीला फुले येणे हा एक अद्वितीय असा निसर्ग सोहळा असतो. साधारणत सप्टेंबर महिन्यात ही वनस्पती फुलण्यास सुरवात होते आणखीन महिनाभर हा सोहळा सुरू असतो.
2022 साली आंबोली घाट आणि तेथून खाली दक्षिणेस ही कारवी फुलली होती. 2023 साली कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारच्या पश्चिमेस बांदिवडे परीसर, खोतवाडी, घुंगुर येथील घाट रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या डोंगरात सर्वत्र ही वनस्पती प्रचंड प्रमाणात फुलली होती. पुण्याजवळ ताम्हणी घाट, कोंकणात रत्नागिरी येथे काही ठिकाणी तसेच मुंबई येथे पण जंगलात ही 2023 साली फुलली होती.
या वर्षी प्रामुख्याने इसापूर, पारगड, आजरा, पाटगाव, राधानगरी, बर्की, आंबा या परिसरातील ही कारवी मोठ्याप्रमाणात फुलांवर आली आहे.
"सोने पे सुहागा" या म्हणी प्रमाणे यावर्षी Strobilanthes sessilis
(Pleocaulus ritchei) - माळ कारवी, टोपली कारवी ही कारवी प्रजात देखील चांदोली पासून उत्तरेकडे अगदी कास, सातारा, राजगड, रतनगड, तोरणा, लोणावळा, खंडाळा येथील उंचच उंच डोंगर रांगात भरपूर प्रमाणात फुलली आहे. ही वनस्पती 7 ते 12 वर्षांनंतर फुलते असे म्हटले जाते. साल 2016 साली आंबोली परीसरात ही मोठ्याप्रमाणात फुलली होती व त्याची पक्की नोंद केलेली आहे. या वर्षी अद्याप तरी फुललेली नाही. या नंतर ती कोणत्या वर्षी फुलते याची नोंद केली जाईल. तदनंतर ही वनस्पती नेमके किती वर्षांनंतर फुलते हे कळेल.
या फुलोरा मुळे डोंगरच्या डोंगर, कडेकपारी, गडवाटा, सडे इ इ निळे-जांभळे होत आहेत.
तेथे आपल्यास हा निसर्गाचा अद्भुत सोहळा या पंधरवड्यात अनुभवता येणार आहे.
फारूक म्हेतर
वन्यजीव अभ्यासक
कोल्हापूर
90 28 81 60 60

Comments
Post a Comment