Myristica Swamp

 Myristica Swamp


शोध एका नवीन मायरिस्टिका स्वॅम्पचा (दलदल वन)   - गावकऱ्यांनी जपलेला निसर्गाचा अद्भुत वारसा !!! "दलदल देवराई"
मायरिस्टिका स्वॅम्प एक अत्यंत दुर्मीळ परिसंस्था असून महाराष्ट्रातील दोडमार्ग तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कुब्रल या गावात तिचे अस्तिव दिसून आले आहे. कुंब्रल गावातील भालानडेश्वर देवराईत तिचे अस्तव जपले गेले आहे.
वानोशी फाॅरेस्ट होम स्टे चे प्रवीण देसाई आणि विशाल सडेकर यांना निसर्ग भ्रमंती करत असते वेळी ऑक्टोबर 2023 मधे ही वैशिष्ट्यपुर्ण जागा सापडली. त्यानंतर वनस्पती तज्ञ शितल देसाई यांनी येथे सखोल अभ्यास करून याचा शास्त्रीय पेपर Journal of Threatened Taxa या जागतिक नियतकालिकेत प्रसिद्ध केला आहे.
मायरिस्टिका स्वॅम्प हे वृक्षाच्छादित पाणस्थळ जागा असते
ही परिसंस्था प्रामुख्याने जायफळच्या जातीतील झाडानी बनलेली असून एका विशिष्ठ प्रकारच्या वातावरणातच आढळून येते.  मायरिस्टिका स्वॅम्प परिसंस्था ज्या ठीकाणी बारमाहीपाणी असते आणखीन वर्षभर संथ गतीने वाहते असते तेथेच तयार होते.  येथील जमीन कायमस्वरूपी दलदलीची असल्यामुळे त्यात जीवनावश्यक वायुंचा अभाव असतो. त्यामुळे गोड्या पाण्यातील दलदलीच्या ठिकाणे वाढणाऱ्या या झाडांना खारफुटीच्या झाडाप्रमाणे जमिनीच्यावर आलेली मुळे दिसून येतात. यांचा वापर वायूची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो आणि नंतर मुख्य खोडातून फुटलेली मुळे, मऊ आणि अस्थिर जमिनीत यांत्रिकरित्या झाडांना आधार देतात. एखाद्या स्पंजप्रमाणे पाणी शोषून घेऊन दलदल,नाले आणि भूजल स्रोतांमध्ये बारमाही पाणी उपलब्ध करण्याचे महत्वाचे कार्य ही परिसंस्था करते.
मायरिस्टिका स्वॅम्प परीसंस्थेला जिवंत जीवाश्म म्हटले जाते कारण ती अति प्राचीन असून कित्येक कोटी वर्षापासून त्याचा अस्तित्व आहे.  अनेक प्रकारच्या दुर्लभ प्राणी,पक्षी,कीटक आणि इतर जैवविविधतेचा त्या केंद्रबिंदू आहेत. येथील परीसंस्था ही क्लायमॅटीक क्लायमेक्स असते. एकेकाळी भारताच्या संपुर्ण पश्चिम किनारपट्टीवर विस्तार असलेली ही झाडे आता काही विशिष्ठ ठिकाणीच दिसून येतात. मायरिस्टिका स्वॅम्प भारतात प्रदेशानिष्ठ असून फक्त पश्चिम घाट, मेघालय, अंदमान निकोबार या ठीकाणीच आढळून आल्या आहेत.
या प्रकारच्या परीसंस्था लाखों-लाख वर्षांपूर्वी जेव्हा पश्चिम घाट तयार होत होता आणि भारत मादागास्कर पासून विलग होत होता त्या पुर्वी तयार झाल्याचे येथील वनस्पती प्रजातींचा अभ्यास केल्यानंतर सिद्ध होत आहे.  म्हणजेच डायनासोर अस्तित्वात येण्या पुर्वी पासून!!!
याच प्रकारच्या मायरिस्टिका स्वॅम्प अमेझाॅन, मादागास्कर या ठिकाणी आढळून येतात, तेथेही जायफल वर्गीय वनस्पतींचा आणि भारतात आढळून आलेल्या जायफल वर्गीय वनस्पतींचा जनूकीय संबंध आढळून आला आहे.
भारतात कर्नाटक,केरळ गोवा तेथे मायरिस्टिका स्वॅम्पस् च्या नोंदी झाल्या आहेत, तर महाराष्ट्रातून हेवाळे गावातून याची पहिल्यांदा नोंद केली असून कुंब्रल गावातून तिची ही दूसरी नोंद आहे.
या सर्व मायरिस्टिका स्वॅम्पस् वातावरण बदल, शहरीकरण, प्रदुषण इ मानवीय उपद्रवामुळे धोका ग्रस्त झाल्या आहेत.
पश्चिम घाटातील आत्तापर्यंत शोध लागलेल्या बहुतांश मायरिस्टिका स्वॅम्पस् या संरक्षित क्षेत्रा बाहेर आहेत. त्यामुळे त्या खुपच धोकादायक स्थितीत आहेत, दलदल असल्याने अनेक ठीकाणी त्यांची तोड करून भात शेती करण्यात आली आहे. अश्या परिस्थितीत कुंम्ब्रल आणि हेवाळे येथे आढळून आलेल्या मायरिस्टिका स्वॅम्पस् खास प्रयोजन करून त्यांचे जतन करने अत्यंत महत्वपूर्ण आणि गरजेचे आहे.
पश्चिम घाटातील मायरिस्टिका स्वॅम्प या जिवंत म्युजियम आहेत. केरळ आणि कर्नाटक येथील अभ्यास सांगतो की तेथे 79 वृक्ष प्रजाती आढळून आल्या आहेत. पैकी 23 या प्रदेशानिष्ठ आहेत, 26 प्रजातींचे झुडुपे, 27 प्रजातींच्या वेली आणखीन 44 प्रजातींची लहान लहान वनस्पतीची नोंद करण्यात आली आहे. अजूनही नव नवीन प्रजातींचा शोध लागतच आहे. 
प्राणी जगताचा विचार करता जवळपास 630 प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. ज्यात 14 प्रजातींचे मासे, 56 प्रजातींचे उभयचर प्राणी आढळतात.
अनेक प्रकारचे खेकडे या परीसरात आपले घर बनवतात, रान जायफलाचे बी योग्यरित्या रूजवण्याचे काम हे खेकडेच करतात.  हाॅर्नबिल सारखे देखणे पक्षी या जायफल वर्गीय फळांचा आनंदाने आस्वाद घेतात. अनेक प्रजातींचे पक्षी खासकरून विविध प्रकारचे घुबड येथे सुरक्षित आश्रय घेतात.
पश्चिम घाट हा 24 डान्सींग बेडकांचे निवासस्थल आहे पैकी Kottigehar Dancing Frog (Micrixalus kottigeharensis) ही प्रजात मायरिस्टिका स्वॅम्प मधील पाण्याच्या ओहोळात आढळून येते ही प्रजात जगातील टाॅप 100 EDGE (Evolutionarily Distinct and Globally Endangered) मधे समाविष्ट आहे.
2000 साली कर्नाटक येथील मायरिस्टिका स्वॅम्प मधे Semecarpus kathalekanensis या Critically Endangered वृक्ष प्रजातीचा शोध लागला आहे ही दुर्मिळ वृक्ष अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतके कमी शिल्लक आहेत आणखीन त्या प्रजातींत प्राण्याप्रमाणे नर वृक्ष आणि मादी वृक्ष असे वेगवेगळे वृक्ष असतात. अधिक अभ्यासाअंति असे आढळून आले आहे की या वृक्षांपैकी फक्त 10% च मादी वृक्ष आहेत.
महाराष्ट्रातील दोडमार्ग तालुक्यातील हेवाळे येथील मायरिस्टिका स्वॅम्प नंतर कुंम्ब्रल येथे आढळलेली ही दुसरीच नोंद आहे.
या ठीकाणी आढळून येणाऱ्या जैवविविधतेचा अधिक अभ्यास होणे खुप गरजेचे आहे.  जगभर मायरिस्टिका स्वॅम्प मधे नव नवीन प्रजातींचा शोध लागतच असल्यामुळे महाराष्ट्रातील या दुसऱ्या ठिकाणचा शोध लागने महाराष्ट्राचे अमेझाॅन म्हटले गेलेल्या दोडमार्ग तालुक्याचे पर्यावरणीय महत्व अधोरेखित करते.
मायरिस्टिका स्वॅम्प मधील अनेक वनस्पती इतरत्र जगूच शकत नाहीत त्याच प्रमाणे येथील किटक, उभयचर, जलचर सुद्धा इतरत्र आढळत नाहीत.
कुंम्ब्रल येथे आढळून आलेली ही परीसंस्था दोडमार्ग तालुक्याच्या वैभवात अधिक भर घालणारी घटना आहे.  आज पर्यंत जसे तिचे योग्य प्रकारे जतन, संवर्धन आणि संरक्षण स्थानिक गावकरी लोकांनी केले आहे तसेच पुढील काळात पण करने आपले परम कर्तव्य आहे.


Team Vanoshi Forest Home Stay 

Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार