फुलपाखरांची बाग
Faruk Mhetar
Kolhapur
सद्या पावसाळ्याची सुरूवात होते आहे. मस्त वातावरण झाले आहे. लवकरच पाऊसाला नियमित सुरुवात होईल. निसर्गात नवी नवलाईची सुरुवात आधीच चालू झाली आहे. खुपश्या वनस्पतींना नवीन पालवी फुटू लागलीय, नवनवीन रोपे जमीनीत रूजत आहेत. माळराने हिरवीगार शालू पांघरू लागतेत.
अनेक पक्षी त्यांचा विणीचा हंगाम सुरू व्हायची वाट पहात आहेत, जोड्या जमत आहेत, घरटी बांधण्यासाठी योग्य जागेची निवड सुरू आहे. अचानक अनेक प्रजातींची फुलपाखरे दिसायचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे आपल्याला भिरभिरत फिरताना दिसत असतील, त्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू झालाय. अनेक फुलपाखरांचे नवीन पालवी फुटलेल्या वनस्पतींवर एकसारखे उडत राहणे चालू आहे. अचानक इतकी सारी फुलपाखरे कुठुन आली याचे आपल्याला आश्चर्य देखील वाटत असते.
आपणही निश्चितच आपल्या बागेत काय काय लावायचे, नवीन कोणती झाडे लावायची याचा आराखडा तयार करत असणार.
जवळपास सर्वांनाच फुलपाखरांच आकर्षण असते. खुप लोकांना फुलपाखरांच आपल्या बागेत बागडणे आवडते. अनेक जण फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची फुलझाडे आपल्या बागेत लावत असतात पण नेमकी कोणती फुले फुलपाखरांना आकर्षित करतात हेच माहित नसते. अनेक जणांना फुलपाखरांच जीवनक्रम बघायचा असतो. आपल्या मुलांना दाखवायचा असतो. पण फुलपाखरे नेमक्या कोणत्या फुलांवर आकर्षित होतात, कोणत्या झाडांवर अंडी घालतात याचे ज्ञान नसते.
आपण नेमक याच बाबतीत माहीती घेणार आहोत.
तर चला मग आपण एका वेगळ्या विश्वात जाऊया, आपली बाग जिवंत आणि रंगीत बनवूया !!! 😊
छान किती दिसते फुलपाखरू ! ! !
बहुतांश फुलपाखरांना फुलांतील मकरंद (nectar) अन्न म्हणून लागते. ज्या वनस्पतींच्या फुलांवर फुलपाखरे आपली उपजीविका करतात, त्या वनस्पतीना नेक्टर प्लाॅन्टस म्हटले जाते.
फुलपाखराचे जीवनक्रम अंडी, अळी, कोष आणि प्रौढ(adult) फुलपाखरू असे असते. मादी फुलपाखरू आपली अंडी फार काळजीपुर्वक ठराविक वनस्पतीवरच घालते. यासाठी ती खुप मेहनत घेते. कित्तेकदा काही किलोमीटर प्रवास करून योग्य तीच वनस्पती शोधते व त्यावर अंडी घालते. काही फुलपाखरांच्या प्रजातींत (monophagous) खाद्य वनस्पतीची एखादीच प्रजात असते तर काही फुलपाखरे (polyphagous) अनेक प्रजातींच्या वनस्पतींवर अंडी घालतात. या फुलपाखरांच्या अंळीच्या खाद्य वनस्पतींना होस्ट प्लॅन्टस् असे म्हणतात. फुलपाखरांच्या प्रत्येक प्रजातीत खाद्य वनस्पती या वेगवेगळ्या असतात. खाद्य वनस्पतींच्या उपलब्धतेवरच फुलपाखरांची संख्या अवलंबून असते. म्हणजेच फुलपाखरांच अस्तित्व हे खाद्य वनस्पतींच्या अस्तित्वा वरच अवलंबून आहे. सर्वसाधारणतः बहुतांश फुलपाखरांच्या अळ्या खाद्य वनस्पतींची पाने खातात.
एखाद्या परीसरातील फुलपाखरांची संख्या, विविधता तेथे उपलब्ध असलेल्या फुलझाडांच्या संख्येवर अवलंबून नसते तर तेथील खाद्य वनस्पतींच्या उपलब्धतेवर व विविधतेवर अवलंबून असते.
Gardening for Butterflies !!!
फुलपाखरांसाठी बागकाम !!!
आपण आजकल पाहतोय की शहरातील अनेक बागा, लोकांच्या खाजगी बागा या निरनिराळ्या फुलझाडांनी भरलेल्या आहेत. आणखीन दिवसेंदिवस यात भरच पडत चाललीय. तरी देखील फुलपाखरांच्या संखेत कमालीची घट होतेय तर काही प्रजातींची फुलपाखरे दुर्मिळ होत चालली आहेत. याचे मुख्य हे या फुलपाखरांच्या अळी ला लागणार्या खाद्य वनस्पतींची कमतरता व दुर्भिक्ष. आणि म्हणूनच फुलपाखरांच्या संवर्धनासाठी फुलझाडांसोबतच त्यांच्या अळ्यांना लागणार्या खाद्य वनस्पतींची लागवड करने खूप गरजेचे आहे.
फुलपाखरे आपल्या बागेत कशी आकर्षित करायची?
फुलपाखरांना खाद्य म्हणून मकरंद लागतो आणि आपल्याकडे बागेत, घरा घरात अनेक फुलझाडे लावलेली असतात तरी सुद्धा फुलपाखरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे याचे प्रमुख कारण फुलपाखरांच्या अंळ्यांच्या साठी लागणार्या खाद्य वनस्पतींची कमतरता, त्याविषयी असलेले आपले अज्ञान आणि आपले दुर्लक्ष. म्हणूनच फुलपाखरांच संवर्धन करायचे असेल तर त्यांच्या खाद्य वनस्पतींचे संवर्धन करने आवश्यक आहे.
तर चला या पावसाळ्यात आपण स्वतः पासून सुरवात करूया, खाद्य वनस्पतींची माहीती घेऊया आणि फुलपाखरांच्या संवर्धनास हातभार लावूया.
फुलपाखरांच उद्यान बनवण्यास फार मोठ्या जागेची गरज आहे असे काही नाही. आपल्या अंगणात, परस बागेत, अपार्टमेंट च्या विंडोसील मधे, सोसाइटीज च्या बागेत, सार्वजनिक बागेत कुठेही आपण फुलपाखरांची बाग फुलवू शकतो. फक्त एकच अट लागू फुलपाखरांना लागणार्या बहुतांश वनस्पतींना भरपूर सुर्य प्रकाश लागतो. मोठ्या झाडांच्या सावलीत या वनस्पती चांगल्या प्रकारे वाढत नाहीत आणि फुलपाखरे अंडी घालण्यासाठी सुदृढ वनस्पतीच निवडतात.
जर तुम्ही नव्यानेच फुलपाखरांच उद्यान बनवणार असाल तर खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.
• जास्तीत जास्त सुर्य प्रकाश हवा
• खुप सावली व अंधार असलेली जागा चालत नाही
• मोठी झाडे नसावीत
• वर्षभर पाण्याची सोय असावी
• पाण्याचा योग्य निचरा हवा
• शक्य असेल तर आर्किटेक्चर कडून लेआउट करून घ्यावे
• बागेत फिरण्यासाठी पाथ-वे असावेत
• पाथ-वे हे वेलींसाठी वापरता येतात त्यासाठी पाथ-वे वर फॅब्रीकेशन करून आर्क चे स्ट्रक्चर उभे करावे
• फ्रुट बेट साठी मोठे दगड रचून जागा करावी
• मड पडलिंग साठी छोटी जागा ठेवावी
फुलपाखरांना आवडणारी फुलझाडे कोणती? कोणती फुलपाखरे कोण कोणत्या वनस्पतीवर अंडी घालतात?
हे सर्व आपण जाणून घेऊया पुढील काही दिवसात! 😊
सुर्य प्रकाश आणि फुलपाखरांच खुप घनिष्ठ नाते आहे. सुर्य प्रकाश चांगला पडल्या शिवाय फुलपाखरांच जीवन चालू होत नाही ढगाळ वातावरणात फुलपाखरे लगेच सुस्त पडतात आणि लपून बसतात. मादी फुलपाखरे पण त्याच खाद्य वनस्पतीवर अंडी घालतात जी भरपूर सुर्य प्रकाशात असतात कारण या वनस्पतींची पाने सुदृढ आणि पोषक तत्व असलेली असतात.
फुलपाखरू उद्यान करत असतानाच तुम्ही फक्त फुलपाखरांच संवर्धन करत नाही तर त्याच बरोबर अनेक वृक्ष, वेली, झुडुपे, कीटक, मधमाश्या, पक्षी, सरडे, कोळी इत्यादि सगळ्यांचे संवर्धन करता. एक प्रकारची परीसंस्थाच (इको सिस्टमच) तयार होते तेथे.
Web of Life ! ! !
आपण क्रमाक्रमाने फुलपाखरांच्या अळींच्या खाद्य (होस्ट) वनस्पतींची माहिती घेऊ 😊
Host Plant खाद्य वनस्पती निवडते वेळी नर्सरीत वारंवार भेट देऊन शक्यतो अशी रोपे निवडावीत ज्यावर आधीच फुलपाखरांनी अंडी घातलेली आहेत. खुपदा असे आढळले आहे की नर्सरीत एखाद्या वनस्पती प्रजातीची अनेक रोपे असतात पण फुलपाखरांनी त्यातील ठराविकच रोपे अंडी घालण्यासाठी निवडलेली असतात. अशी रोपे आणल्यास आपल्या बागेत लगेचच फुलपाखरांचे वावर सुरू होते. याचे मुख्य कारण फारसे अभ्यास नाही झालेय पण माझ्या निरीक्षणा नुसार बर्याच वनस्पती पाने अळयांनी कुरतडल्यावर विशिष्ट प्रकारचे केमिकल्स सोडतात जे अधिक फुलपाखरांना आकर्षित करतात.
अनेक प्रजातींच्या वनस्पतीं फुलपाखरांच्या अळ्यांनी भरलेल्या असतात. पण काही वर्षांनंतर त्यावर फुलपाखरे अंडी घालायचे बंद करतात. कारण या वनस्पती कालांतराने त्यांच्यात असे केमिकल्स तयार करतात जे फुलपाखरांना आकर्षित करत नाहीत किंबहुना त्यांना परावृत्त करतात. त्यामुळे अश्या वनस्पती आपल्याला कालांतराने बदलाव्या लागतात, नवीन रोपे आणावी लागतात.
तसेच बरीच फुलपाखरे उंच वाढलेल्या वृक्षांवर अंडी घालत नाहीत जमीनी लगत 1-5 फुटांपर्यतच अंडी घालतात म्हणून आपल्यास आपल्या बागेतील झाडांची उंची नेहमीच कमी ठेवावी लागते फुलपाखरांची मादी ही शक्यतो कोवळ्या पानांवर अंडी घालते तसेच अंळ्या देखील सुरवातीस कोवळी पाने खातात म्हणून बागेतील वनस्पतींची वेळोवेळी छाटणी करने गरजेचे आहे.
फुलपाखरांचा सर्वात मोठा शत्रु म्हणजे किटक नाशके, त्यांचा वापर करणार असाल तर फुलपाखरांची बाग करण्याचा विचार सोडून द्या 👉
Symbiotic relationship with ants 🐜
Seasonal seeds
Winter
Summer
Rainy
1) The curry plant : Murraya koenigii / Bergera koenigii
कडीपत्ता
Host plant for Common Mormon, Lime Butterfly
Also caterpillars of Apefly feeds on mealybugs that grow on Curry tree.
कडीपत्ता ही मसालावर्गीय वनस्पती असून ती सहजपणे कोणत्याही नर्सरीत उपलब्ध होते. मोठ्या कुंडीत अथवा जमीनीत लावले तरी चालते. कडीपत्ता चे खुप मोठे वृक्ष होत नाहीत.
काॅमन माॅरमान या फुलपाखराच्या अळीचे हे आवडते खाद्य वनस्पती आहे.
साधारणतः वर्षभर हे फुलपाखरू यावर अंडी घालते पण पावसाळ्यात याचे प्रमाण जास्त असते.
आपल्या बागेत एक-दोन याची रोपे लावल्यास फुलपाखरे पण येतात आणि कडीपत्ता पण मिळेल.
जेव्हा कडीपत्ताला फुले येतात तेव्हा खुप फुलपाखरे आणि मधमाशा येतात. याची फळे पक्षी चवीने खातात.
कडीपत्ता लावा हमखास काॅमन माॅरमान हे फुलपाखरू आपल्या बागेत वाढवा.
अनेक जण आपल्या बागेत कडीपत्ता स्वयंपाकात वापरण्यासाठी हमखास लावतात परंतू त्यावर माॅरमान फुलपाखरे हमखास अंडी घालतात. मग या अळ्या पाने खातात म्हणून लोक यावर तणनाशक फवारतात, अळ्या काढून टाकतात. कृपया यापुढे हे नक्कीच टाळाल हे अपेक्षित !!!
2) Citrus species
लिंबू वर्गीय वनस्पती
Larval Host Plant for Common Mormon, Lime butterfly, Red Helen, Blue Mormon, Lime Blue.
लिंबू आपल्या आहारात महत्वपूर्ण फळ आहे. याच्या अनेक प्रजाती आहेत जसे लिंबू, कागदी लिंबू, इडलिंबू, माकडलिंबू म्हाळूंग इ इ या सर्व प्रजाती फुलपाखरांचे होस्ट प्लॅन्ट आहेत. वेगवेगळ्या प्रदेशात वर नमुद केलेल्या फुलपाखरांच्या अळ्या या वेगवेगळ्या लिंबू वर्गीय वनस्पती खाद्य म्हणून वापरतात.
अगदी संत्री, मोसंबी या लिंबू वर्गीय वनस्पतीवर पण ही फुलपाखरे अंडी घालतात.
तुम्हास उपलब्ध होतील तेवढ्या लिंबू वर्गीय वनस्पती लावल्यास तुमच्या बागेत वरील पैकी किमान दोन तीन प्रजातींची फुलपाखरे हमखास ब्रीडिंग करतील.
या वनस्पती तुम्हास जवळपास सर्व नर्सरीत मिळतील.
मोठ्या कुंडीत वा जमीनीत पण या वनस्पती उत्तम वाढतात.
जमीनीत लावलेस कालांतराने फळे पण मिळतील. 😊
या वनस्पतींच्या फुलांवर मधमाशा, फुलपाखरे नेक्टर पण घ्यायला हमखास येतात.
ब्ल्यू माॅरमान हे फुलपाखरू कागदी लिंबू, इडलिंबू व म्हाळूंग ही वनस्पती निवडते.
लिंबू वर्गीय वनस्पतीवर काॅमन माॅरमान हमखास अंडी घालते इतर फुलपाखरांच प्रमाणात एरिया वाईज बदलत जाते, जंगल भागात रेड हेलन हे फुलपाखरू येते.
3) Kalanchoe pinnata / Bryophyllum pinnatum
पानफुटी
Larval Host Plant
Talicada nyseus – Red Pierrot
मुळची मादागास्कर ची असलेली ही शोभिवंत व औषधी वनस्पती जगभर पसरली आहे.
ही वनस्पती शहरातील बहुतांश नर्सरीत उपलब्ध होते.
नावा प्रमाणेच या वनस्पती ची रोपे फक्त याची पाने लावूनही करता येतात. या वनस्पतीची एक दोन पाने तोडुन जमिनीत लावली तरी त्यांना फुटवा फुटतो . लहान झुडप असलेल्या या वनस्पतीला फार सुंदर फुले येतात. सर्व प्रकारच्या जमीनीत ही सहजपणे रूजते, फार पाणी पण लागत नाही. फक्त भरपूर सुर्य प्रकाश लागतो सावलीत फारशी वाढ होत नाही.
या वनस्पती चा जमीनीत एखादा लहान बेड तयार करावा वा कुंडीत लावले तरी चालते.
रेड पियारो हे सुंदर फुलपाखरू या वनस्पतीवर हमखास आकर्षित होते अगदी अपार्टमेंट मधे चौधा पंधराव्या मजल्यावरील विंडोसील मधे लावलेल्या Kalanchoe pinnata वर सुद्धा अंडी घालतात. रेड पियारोची मादी यांच्या पानांवर अंडी घालतात,यांची पाने मांसल व जाड असतात, या फुलपाखराची अळी या पानात शिरून आतील गर खाते, त्यामुळे सहजपणे नजरेस पडत नाही. पानातील गर संपला की अळी बाहेर येऊन दुसऱ्या पानात शिरते. अळीची आपली विष्ठा पाना बाहेर सोडते त्यामुळे अश्या वनस्पतींची पाने पोचट व विष्ठेने माखलेली असते.
अळीची पुर्ण वाढ झाल्यावर ती पानातून बाहेर येऊन कोष तयार करते.
ही फुलपाखरे खुप प्रमाणात अंडी घालतात त्यामुळे या वनस्पतींचा एक मोठा वाफा करने आवश्यक आहे.
4) Oxalis corniculata
आंबोशी
Larval Host Plant -
Pseudozizeeria maha – Pale Grass Blue
ही लहानशी वनस्पती आपल्याकडे सर्वत्र आढळते, बरेच जण तण म्हणून काढून टाकतात. पण ही वनस्पती Pale Grass Blue या लहानश्या फुलपाखराच्या अळीचे खाद्य वनस्पती आहे.
याची पाने जर आपण खाल्ली तर आंबट-गोड लागतात, म्हणून स्थानीय लोक हीला आंबोशी असे म्हणतात.
या वनस्पतीला चिटुकली पिवळीधमक फुले येतात, त्यावर पण लहान लायसीनीड फॅमिलीतील फुलपाखरे मकरंद घ्यायला येतात.
ही वनस्पती आपल्यास कोठेही आपोआपच उगवलेली आढळेल. याच्या शेंगा परिपक्व झाल्यानंतर त्यांना स्पर्श केला असता त्या तडकतात व इवलूश्य्या चाॅकलेटी लाल रंगाच्या बिया सर्वत्र उधळल्या जातात.
आपण जर बागेत याचा एखादा ताटवा केला किंवा एखाद्या स्वतंत्र कुडीत ही वनस्पती वाढवली तर या फुलपाखराचा जीवनक्रम नक्कीच अभ्यासू शकता
ही वनस्पती कोठेही सहजपणे उपलब्ध होते.
या वनस्पतीचे हॅगिंग पण फार छान दिसते.
या फुलपाखराची अळी शोधने फार महाप्रयासाचे काम आहे कारण या अळ्या अगदी या वनस्पतीच्या पानांच्याच रंगाच्या असतात 😊
5) Pithecellobium dulce – जंगल जिलेबी, विलायती चिंच
Larval Host Plant
Prosotas nora – Common Lineblue
Prosotas dubiosa – Tailless Lineblue
Anthene lycaenina – Pointed Ciliate Blue
Charaxes solon – Black Rajah
Charaxes psaphon – Plain Tawny Rajah
Eurema hecabe – Common Grass Yellow
मुळचा दक्षिण अमेरिकन असलेला हा वृक्ष भारतात चांगलाच स्थिरावला आहेच पण इथल्या पर्यावरणात आता महत्वपूर्ण स्थान मिळवलेला एक मोठा वृक्ष बनला आहे.
साधारणतः 30 फुटां पर्यंत उंच होऊ शकतो.
याची फळे लोक आवडीने खातात त्याच बरोबर अनेक पक्षी सुद्धा यावर गुजराण करतात. शेळीपालनात याचा पाला फार उत्कृष्ट मानला जातो.
जेव्हा या वृक्षाला फुले येतात तेव्हा असंख्य किटक यावर घोंघावत असतात.
जवळपास 6 प्रजातीच्या फुलपाखरांच्या अळींचे हा वृक्ष खाद्य वनस्पती आहे.
याची रोपे अनेक नर्सरीत मिळतील तसेच याच्या बिया लावल्यास सहजपणे रूजते आणि रोपे बनतात.
या वृक्षा खाली हमखास याची लहान लहान रोपे उगवलेली असतात पावसाळ्यात ती उपटून आणलेस लगेच लागू होतात.
Eurema hecabe – Common Grass Yellow
या फुलपाखराचे हे फेवरिट खाद्य आहे.
फक्त हा वृक्ष खुप मोठा होत असलेने मोठ्या कुंडीत लावावा अन्यथा जमीनीत लावलेस नंतर त्रास होऊ शकतो.
चला तर मग आणा याचे रोप आणि फुलपाखरे येतील तुमच्या बागेत. 😊
6) Turmeric हल्दी, हळद
Curcuma longa
Turmeric is a flowering plant of the ginger family, Zingiberaceae
Larval Host Plant - Udaspes folus – Grass Demon
हळद महत्वपूर्ण मसालावर्गीय वनस्पती आहे याचे औषधीय आणि स्वयंपाकातील उपयोग सर्वांना माहित आहेतच.
हळदीचे कच्चे कंद जर आपण जमीनीत लावले तर त्यातून फुटवे येतात व छान झुडुप तयार होते.
या वनस्पतीला फक्त पावसाळ्यातच पाने येतात बाकी वर्षभर याचे कंद जमीनीत डाॅरमंट अवस्थेत राहतात आणि हाच ग्रास डेमन या फुलपाखराचा विणीचा हंगाम असतो.
हे फुलपाखरू हळदीच्या पानांवर अंडी घालते. याची अळी मांसल हिरव्या रंगाची असते. अळी या पानांची गुंडाळी आपल्या शरीरातून येणार्या चिकट रेशीम धाग्याने चिटकवून आपले घर बनवते व ते पान आतूनच खात राहते. अळीचा कोषही त्या गुंडाळीतच होतो.
अळ्या हळदीची पाने अश्या बेमालूमपणे गुंडाळते की त्यांना सहजासहजी शोधने शक्य नसते.
भाजी मंडईत कधी कधी कच्ची हळद विकायला येते त्यावेळी आणू शकता.
जर हे फुलपाखरू हमखास आपल्या बागेत आणायचे असेल तर ही वनस्पती नक्की लावा.
छोटासा वाफा करून तेथे हळदीचे कंद लावले तर साधारणतः मार्च पर्यंत आपल्यास भरपूर कच्ची हळद मिळेल त्यापासून वर्षभर पुरेल एवढी हळद पावडर ही बनवता येते.
7) Ricinus communis - Castor Oil plant
एरंड
Larval Host Plant
Ariadne merione – Common Castor
Ariadne ariadne – Angled Castor
एरंडाचे झुडप आपल्याला कोठेही अडगळीच्या, कचरायाच्या जागी उकीरड्यावर निसर्गतः उगवलेले आढळते. साधारणपणे 6-7 फुट वाढणारे हे झुडप जेव्हा फुलावर येते तेव्हा असंख्य किटक यावर घोंघावत असतात.
कॅस्टर ऑईल याच्या बियांपासूनच बनवतात. याची लागवड बियांपासून सहजपणे करता येते. परंतु ही झुडपे जेथे उगवलेली असतात तेथेच जमीनीत याची लहान लहान रोपे हमखास आढळतात. ती जर पावसाळ्यात उपटून आणलेस व लगेच लावली तर नक्कीच जगतात. या झुडपाला भरपूर सुर्य प्रकाश लागतो.
हे झुडप तुम्ही जमीनीत वा कुंडीत वाढवल्यास काॅमन कॅस्टर हे फुलपाखरू हमखास येतात व अंडी घालतात.
याचा जीवनक्रम प्रत्यक्ष बघने फार मजेदार असते.
याचा कोष वाळलेल्या काडी सारखा असतो.
मग निघताय ना तुमच्या गावातील अडगळीच्या जागांवर हे झुडप शोधायला. 👀
आत्ता याची लाईफसायकल चालू आहे सर्वत्र. ☺️
8) Asclepias curassavica – Scarlet Milkweed
हळदी कुंकु
Larval Host Plant
Parantica aglea – Glassy Tiger
Tirumala limniace – Blue Tiger
Danaus genutia – Striped Tiger
Danaus chrysippus – Plain Tiger
Euploea core - Common Crow
Nectar Plant
Danaus chrysippus – Plain Tiger
मुळ मध्य व दक्षिण अमेरिकन असलेले हे झुडप शोभिवंत वनस्पती म्हणून जगभर पसरले आहे. नदी, नाले,तलाव यांच्या किनाऱ्यावरील पानथळ जमीनीत हे झपाट्याने वाढते. कोरड्या आणखीन खडकाळ जमीनीत वाढत नाही.
या वनस्पतीला जवळपास वर्षभर फुले येतात. फुले जवळून डोनाल्ड डक सारखी दिवसात. याच्या बीया वार्याने दूरवर पसरतात.
फुलपाखरू उद्यान मधे हे झुडप पाहिजेच पाहिजे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 5 प्रजातींच्या फुलपाखरांच्या अळ्या याचा खाद्य वनस्पती म्हणून वापर करतात.
हे झुडप उपटून आणलेस लगेच लागू होते, याच्या बिया सुद्धा लवकर रुजतात. फक्त भरपूर सुर्य प्रकाश लागतो, कमी पडला की यावर लगेच अफीडस् ही कीड पडते.
कोल्हापुरात प्लेन टायगर आणि काॅमन क्रो ही दोन फुलपाखरे हे झुडप खाद्य वनस्पती म्हणून वापरल्याची नोंद आहे. मग लागा कामाला शोधा हे झुडप जवळपासच्या पानथळ जागी. ☺️👀
9) Nerium oleander – कन्हेर
Larval Host Plant
Euploea core – Common Crow
Native to the Mediterranean region, including northern Africa, southern Europe and South East Asia
शोभिवंत झाड म्हणून हे बागांमधे लावले जाते याला गुलाबी, लाल इ अनेक रंगांची फुले येतात. कोणत्याही नर्सरीत याच्या अनेक व्हरायटीज मिळतील. परंतु मुळ गुलाबी रंगाची कन्हेर काॅमन क्रो या फुलपाखराच्या अळीचे आवडते खाद्य आहे. नर्सरीत मिळणारे डाॅर्फ व्हरायटीज वर अंडी घातल्याचे मी तरी पाहिले नाही.
हे झाड खुप मोठा वृक्ष होत नाही आणि याचे कटींग आरामात जगते. याला मध्यम सुर्य प्रकाश लागतो व योग्य निचरा असलेली जमीन लागते.
कन्हेरचा चीक हा दुधी रंगाचा असतो व तो विषारी असतो. पण या फुलपाखरांच्या अळ्या हे वीष पचवू शकतात. त्यामुळेच या अळ्या आणखीन त्यापासून बनलेले कोष व फुलपाखरू सगळेच विषारी बनतात. या गुणधर्मामुळे पक्षी, सरडे, पाली इ फुलपाखरांचे शत्रु सहजासहजी यांच्या वाटेस जात नाहीत.
काॅमन क्रो चा कोष फारच सुंदर दिसतो.
आपल्या फुलपाखरू उद्यानात एखादे झाड नक्कीच लावावे.
आपल्यास जर याच्या एखाद्या झाडावर अळ्या दिसल्या तर ते झाड या फुलपाखरासाठी योग्य असते. त्याच झाडाची फांदी लावून याची रोपे करावीत लगेच रिजल्ट मिळतो 😊👍
10) Polyalthia longifolia – False Ashoka खोटा अशोक, उभा अशोक
Larval Host Plant
Graphium agamemnon - Tailed Jay
Graphium teredon - Narrow Banded Bluebottle
Graphium doson – Common Jay
Graphium nomius – Spot Swordtail
Nectar Plant
Papilio polytes – Common Mormon

भारतीय असलेला हा देखना वृक्ष लॅन्डस्केप गार्डनिंग मधे अनेकदा वापरतात. 20 ते 30 फुट सरळसोट वाढतात. याला फारश्या फांद्या नसतात.
खुप उंच व मोठा होत असल्याने ज्यांच्याकडे कमी जागा आहे त्यांनी कुंडीत लावावे. फक्त कुंडी जरा मोठी असावी. याची रोपे जवळपास सर्वच नर्सरीत उपलब्ध होतील.
फुलपाखरू उद्यान मधे हे झाड हवेच कारण यावर चार वेगवेगळ्या प्रजातींच्या फुलपाखरांच्या अळ्या वाढतात. शिवाय याच्या फुलांवर पण काही फुलपाखरे मकरंद घ्यायला येतात.
याच्या मोठ्या झाडांखाली लहान लहान रोपे हमखास आढळतात. ती उपटून आणलेस लगेच लागतात.
याची फळे वटवाघळे चवीने खातात.
महत्वाचे म्हणजे बहुतांश फुलपाखरे आपली अंडी जमीनी लगत फार फार तर 5-6 फुटांपर्यतच घालतात. यामागे पक्षी, सोसाट्याचा वारा, सरडे यांच्यापासून सुरक्षितता हे मुख्य कारण असते. म्हणून आपले फुलपाखरू उद्यानात नेहमीच कटींग करने आवश्यक आहे.
11) Calotropis gigantea
मंदार/ रूई
Larval Host Plant
Euploea core - Common Crow
Danaus chrysippus – Plain Tiger
Parantica aglea – Glassy Tiger
Danaus genutia – Striped Tiger
Nectar Plant
Catochrysops strabo – Forget-me-not
Tarucus balkanica – Little Tiger Pierrot
Tarucus indica – Transparent Pierrot
Danaus chrysippus – Plain Tiger
Danaus genutia – Striped Tiger
Junonia atlites – Grey Pansy
Calotropis gigantea, the crown flower, is a species of Calotropis native to Cambodia, Vietnam, Bangladesh, Indonesia, Malaysia, Thailand, Sri Lanka, India, China, Pakistan, and Nepal.
ओसाड माळावर, पडीक जमीनीत, रस्त्याकडेला कोठेही उगवणारी आणि तग धरणारी ही वनस्पती फार औषधीय समजली जाते. याच्या पानातील पांढरा चीक विषारी असतो. त्यामुळे या वनस्पती खाद्य म्हणून वापरणारी फुलपाखरे सुद्धा विषारी बनतात, जेणेकरून त्याचे पक्षी, सरडे इ पासून संरक्षण होते.
याला खुप सुंदर फुलोरा येतो, ज्यावर भुंग्यासारखे किटक घोंघावत असतात. ही वनस्पती बियांपासून सहजपणे वाढता येऊ शकते.
सर्वात सोपा मार्ग म्हणजे गावाजवळील पडीक जमीनीत एखादा फेरफटका मारला तर याची लहान लहान रोपे सहजपणे उपटून आणता येतील.
लहान नवजात अळ्या याच्या पानांवर कुरतडून गोल गोल रिंगन बनवतात. जेणे करून पानातील विषारीपणा कमी होतो मग ते पचवने सोपे जाते.
सद्या याची लाईफसायकल सगळीकडेच सुरू आहे. शक्यतो अशी लाईफसायकल सुरू असलेले रोप आणलेस लगेच अभ्यास सुरू. 😊
12) Michelia champaca - सोनचाफा
Larval Host Plant
Tailed Jay
Common Jay
Narrow Banded Bluebottle
हा पिवळेधमक सुवासिक फुले असलेला भारतीय वृक्ष आहे. फार उंच आणि मोठा होणारा हा वृक्षाच्या फुलात असनारे द्रव्य अत्तर बनवण्यास वापरतात. अनेक जण हा वृक्ष सुवासिक फुलांसाठी अंगणात लावतात. याच्या अनेक डाॅर्फ व्हरायटीज नर्सरीत मिळतात.
हा वृक्ष मोठा होत असलेने शक्यतो मोठ्या कुंडीत लावावा. तसेही फुलपाखरे उंच झाडांवर अंडी घालत नाहीत. कटींग करून याची उंची 5-7 फुट इतकीच मर्यादित ठेवावी.
या झाडाच्या कोवळ्या पानांवर पावसाळ्यात हमखास अळ्या दिसून येतात. वरील तीनही प्रकारच्या फुलपाखरांच्या अळ्या सुरवातिच्या काळात काळपट रंगाच्या असतात नंतर वाढ होईल तश्या हिरव्या होतात.
अळी पानाच्या मुख्य शिरेवर विश्रांति घेत असते त्यावेळी ती पानाशी इतकी एकजीव (camouflage) झालेली असते की पान आणि अळी मधील फरक चटकन लक्षात येत नाही.
हा वृक्ष जर आपण आपल्या बागेत लावल्यास वरील तीन फुलपाखरांपैकी टेल्ड जे हे तर हमखास अंडी घालण्यास येईल. उर्वरित दोन फुलपाखरे आले तर बोनस. (टीप - ऐरीया वाईज फुलपाखरे होस्ट प्लॅन्ट बदलतात)
13) Cycas revoluta Sago Palm
Larval Host Plant
Chilades pandava – Plains Cupid
मूळ जपान चा असलेला हा वृक्ष landscape gardening मध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. मोठमोठय़ा बागांमधे याची हमखास लागवड केली जाते. याला जिवंत जीवाश्म म्हंटले जाते कारण याच्यात अगदी dinosaurs च्या काळापासून अल्प बदल झालेला आहे. याला जरी palm म्हंटले जात असले आणि दिसत जरी palm sarkha असला तरी हा palm नाही तर cycad या अगदी primitive जातीचा आहे.
कोणत्याही नर्सरीत हा सहजपणे उपलब्ध आहे. याची वाढ अत्यंत स्लो होत असलेने हा खूप महाग आहे.
या झाडावर Plains Cupid या फुलपाखरे खुप अंडी घालतात. अगदी मध्य शहरातील बागेत पण येतात.
नर्सरी वाले या फुलपाखरांचा फार द्वेष करतात कारण या फुलपाखराच्या अळ्या याची पाने कुरतडून झाडाची शोभा नष्ट करतात.
हा वृक्ष आपल्या बागेची शोभा तर वाढवेलच त्याच बरोबर Plains Cupid हे फुलपाखरू पण आणेल.
14) Pongamia pinnata (Millettia pinnata syn.) करंज
Larval Host Plant
1. Hasora chromus chromus - Common Banded awl
2. Hasora taminatus - White Banded awl
3. Catochrysops strabo - Forget-me-not
4. Curetis thetis - Indian sunbeam
5. Curetis acuta dentata - Acute Sunbeam
6 Jamides bochus - Dark Cerulean
7 Jamides celeno - Common Cerulean
8 Lampides boeticus - Pea Blue
9. Neptis jumbah - Chestnut-streaked Sailer
मुळ भारतीय असलेला हा सदाहरित वृक्ष फार औषधीय आहे. याच्या बियांपासून करंजीचे तेल काढले जाते, जे सांधेदुखी वर वापरले जाते. जवळपास 15 मीटर उंच वाढतो. मार्च, एप्रिल मधे जेव्हा याला फुलोरा येतो तेव्हा असंख्य किटक विषेशतः मधमाश्या घोंघावत असतात.
फुलपाखरांसाठी तर हा वृक्ष फार महत्त्वपूर्ण आहे. जवळपास 9 प्रकारची फुलपाखरे यावर अंडी घालतात.
फार मोठा होत असल्याने लहान बागेत हा वृक्ष मोठ्या कुंडीतच लावावा.
याची रोपे कोणत्याही सरकारी नर्सरीत मिळतील. मोठ्या वृक्षाखाली याची लहान लहान रोपे हमखास आढळतात.
पावसाळ्यात याची लागण लवकर होते.
15) Ficus recemosa उंबर
16) Ficus religious पिंपळ
17) Ficus benghalensis वड
Larval Host Plant
1 Cyrestis thyodamas – Map Butterfly
2 Iraota timoleon – Silverstreak Blue
3 Euploea sylvester – Double-branded Crow
4 Euploea core – Common Crow
5 Euploea mulciber – Striped Blue Crow
वड, पिंपळ, उंबर इ फायकस वर्गीय वृक्ष महाकाय होतात. फार पौराणिक महत्व असलेले हे वृक्ष सद्या बाॅनसाय इंडस्ट्रीज मधील महत्वपूर्ण वृक्ष आहेत. आपल्यास फुलपाखरू उद्यान करायचे असेल तर हे वृक्ष फार उपयुक्त आहेत. प्रचंड मोठे होत असल्याने यांची रोपे कुंडीतच लावावी. काही वर्षांनंतर याचे सुंदर बोनसाय तयार होते.
या वृक्षांची फळे पक्षी आवडीने खातात यांच्या बियांचा प्रसार मुख्यतः पक्ष्यांच्या विष्ठेतूनच होत असलेने याची रोपे आपल्यास मोठे वाडे, बिल्डिंग्स च्या पाईप लाईन वा गटारी कडेस सहजपणे आढळतात. ती उपटून लावल्यास आरामात जगतात, तसेच लहान लहान रोपे नर्सरीतही उपलब्ध असतात.
शहरातील बागेत काॅमन क्रो हे फुलपाखरू हमखास यावर अंडी घालतात. वरील इतर फुलपाखरे जंगल भागात यावर अंडी घालतात.
फायकस वर्गीय इतर झाडेही आपण फुलपाखरांसाठी लावू शकता.
18) Turnera ulmifolia
Larval Host Plant
Acraea terpsicore – Tawny Coster
Nectar Plant
Borbo cinnara – Rice Swift
Suastus gremius – Oriental Palm Bob
Chilades pandava – Plains Cupid
Lampides boeticus – Pea Blue
Acraea terpsicore – Tawny Coster
Eurema blanda – Three-spot Grass Yellow
Eurema hecabe – Common Grass Yellow
Eurema laeta – Spotless Grass Yellow
19) Passiflora foetida
20) Passiflora incarnata
21) Passiflora holocericea
Larval Host Plant
Acraea terpsicore – Tawny Coster
Twany Coster हे फार सुंदर फुलपाखरू जेथे जेथे त्याची खाद्य वनस्पतींची उपलब्ध असेल तेथे तेथे हमखास आढळून येते. हे फुलपाखरू Passifloraceae या प्रजातीच्या बहुतेक सर्व प्रजातीच्या वनस्पतींची पाने खाद्य म्हणुन वापरते.
अगदी घनदाट वस्तीत सुद्धा आढळून आले आहे अपार्टमेंट्स च्या 15 -20 मजल्यावरील बाल्कनीत लागलेल्या झाडावर पण अंडी घातल्याच्या नोंदी आहेत.
Turnera ulmifolia हे लहान झुडूप आहे काही नर्सरीत मिळेल तर Passiflora च्या वेली बहुतेक सर्व नर्सरीत उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे या वेली cuttings लावुन पण येतात. यांना खुप सुंदर अशी निळी, पांढरी फुले येतात त्यांना कृष्णकमळ असे म्हटले जाते.
या वेली खूप पसरतात त्यामुळे मांडव घातलं तर फार छान आहे. हे फुलपाखरू फार जवळ जवळ आणि भरपूर अंडी (गुच्छ) देते अगदी वेली च्या देठावर सुद्धा. याच्या आळ्या काटेरी असतात पण पतंगाच्या अळ्या प्रमाणे त्रासदायक नसतात. याचा कोश तर फारच छान दिसतो.
या वेली जर छान वाढल्या तर असंख्य Tawny Coster फुलपाखरे भिरभिरताना दिसतील तुमच्या बागेत 😊
22) Barleria cristata - कोरांटी
Bluebell Barleria
23) Barleria prionitis - पिवळी कोरांटी
Larval Host Plant
Junonia orithya – Blue Pansy
Junonia almana – Peacock Pansy
Junonia atlites – Grey Pansy
Junonia hierta – Yellow Pansy
Junonia iphita – Chocolate Pansy
Junonia lemonias – Lemon Pansy
Hypolimnas misippus – Danaid Eggfly
कोरांटीच्या अनेक प्रजाती आहेत बहुतांश सर्व वरील पैकी कोणत्या ना कोणत्या फुलपाखराच्या अळीचे खाद्य आहे. निळी कोरांटी ही झुडूप वर्गीय असून शोभिवंत वनस्पती म्हणुन कुंपणावर लावली जाते. याची फुले फार छान दिसतात. Pansy या गटातील जवळपास 7 फुलपाखरू यावर अंडी घालतात. याची वाढ फार झपाट्याने होते. याला भरपूर बिया लागतात, बिया पासून सहजपणे रोपे तयार होतात. महत्त्वाचे म्हणजे cuttings लावुन अगदी आरामात नवीन रोपे तयार होतात.
Pansy वर्गीय फुलपाखराच्या अळ्या बहुतांश रात्री active असल्यामुळे आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत.तसेच यांच्या अळ्या पतंगाच्या अळ्या सारख्या काटेरी असतात. यांचे कोषही मातीच्या रंगाचे असतात त्यामुळे यांच्या अळ्या आणि कोष शोधणे महाकठीण असते.
खेडेगावात अनेक घरांमध्ये या झुडपांचे कुंपन असते.
तुम्ही ही वनस्पती कुंडीत किंवा जमिनीत पण लावू शकता. फुलपाखरू उद्यानाला यांचे कुंपन केले तर फारच उत्तम.
24) Plumbago zeylanica - (पांढरा) चित्रक
25) Plumbago auriculata - निळा चित्रक
26) Plumbago indica - लाल चित्रक
Larval Host Plant
Leptotes plinius – Zebra Blue
पांढरा चित्रक हे जंगली झुडूप असून दक्षिण आशियात सर्वत्र आढळते. भारतीय वनौषधी मध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. हे लहान झुडूप जास्त उन असलेल्या जागेवर लावावा. हे नर्सरीत क्वचितच मिळते.
निळा चित्रक कोणत्याही नर्सरीत सहजपणे उपलब्ध आहे.
लाल चित्रक कोंकणात जास्त करून आढळते.
ही वनस्पती जगायला फार चिकट आहे. यांच्या शेंगा फार चिकट असतात, रानात चरत असलेल्या प्राण्यांच्या शरीरावर चिटकून या शेंगांचा प्रसार होतो. बियांपासून फार लवकर लागते.
Zebra Blue हे सुंदर फुलपाखरू या झाडावर हमखास अंडी देते. अळी मुख्यतः फुले आणि फळे खाते. त्यामुळे व अत्यंत एकरूप होऊन राहत असल्याने शोधणे महा कठीण असते.
या तीनही वनस्पती सुंदर आहेत. या वनस्पती आपल्या बागेत लावा आणि आणखीन एक फुलपाखरू आपल्या बागेत आणा 😊
27) Cassia fistula – बहावा Golden shower
Larval Host Plant
Catopsilia pyranthe – Mottled Emigrant
Spindasis vulcanus – Common Silverline
Catopsilia pomona – Lemon Emigrant
Eurema hecabe – Common Grass Yellow
Anthene emolus - Common Ciliate Blue
मूळ भारतीय असलेला हा वृक्ष दक्षिण पूर्व आशिया मध्ये आढळते. अत्यंत औषधीय असलेला हा वृक्ष medicine, fuel, timber, and tanning करिता जगभर पसरलेला आहे. 10 ते 15 meters उंच वाढणारा हा वृक्ष कोणत्याही प्रकारचा जमिनीत वाढतो. याला शेवग्याच्या सारख्या शेंगा येतात. बिया पासून याची रोपे तयार करतात. सरकारी नर्सरीत याची रोपे सहजपणे उपलब्ध आहेत. काही खाजगी नर्सरीत पण उपलब्ध आहेत. रस्ता बाजूला लावणे साठी फार उपयोगी आहे.
फार मोठा होत असल्यामुळे कुंडीत लावावा. वर उल्लेख केलेले फुलपाखरू यावर हमखास अंडी घालतात.
उन्हाळ्यात Golden Shower सारखी फुले येतात तेव्हा याचे सौंदर्य फार खुलून दिसते.
Emigrant या फुलपाखराच हे आवडले झाड आहे.
The ripe pods and seeds are widely used in both traditional and conventional medicine as a laxative. The root-bark, leaves and flowers also have laxative properties.
28) Capparis zeylanica – वाघाटी
Larval Host Plant
1) Appias libythea – Western Striped Albatross
2) Appias lyncida – Chocolate Albatross
3) Belenois aurota – Pioneer
4) Cepora nerissa – Common Gull
5)Hebomoia glaucippe – Great Orange-tip
6) Ixias pyrene – Yellow Orange-tip
7) Leptosia nina – Psyche
8) Pareronia hippia – Indian Wanderer
9) Prioneris sita – Painted Sawtooth
Capparis zeylanica is a climbing shrub common in the forests of the Indian subcontinent, Indo-China, China and Malaysia
वाघाटी हा फार मोठा वाढणारा सदाहरित काटेरी वेल आहे. याची फुले फार देखणी असतात. सुरवातीला पांढरी असणारी फुले नंतर गुलाबी रंगाची होतात. वाघाच्या नखा सारखी बाकदार काटे फार अणकुचीदार असतात त्यामुळे याच्या झुडपांच्या जवळपास कोणीही फिरकत नाहीत.
जून-जुलै महिन्यात याची लाल भडक रंगाची फळ पिकतात. आशाढी एकादशीला या फळांची भाजी केली जाते. म्हणुनच या कालावधीत बाजारात याची फळे हमखास विक्रीसाठी उपलब्ध असतात. लाल भडक केशरी रंगाची फळे जर आपण आणली आणि याच्या बिया लगेच लावल्या तर पटकन रुजतात.
वेल काटेरी असल्याने आपल्या बागेत एका कोपर्यात लावावा. या वनस्पतीला भरपूर सुर्य प्रकाश लागतो. याचे आयुर्वेदिक औषधात खुप उपयोग आहेत.
फुलपाखराच्या जवळपास 9 प्रजाती या वनस्पतींची खाद्य वनस्पती म्हणुन वापरतात.
वरील पैकी Common Gull, Pioneer आणि Wanderer हे तीन फुलपाखरू साठी तर हे फेवरेट Host Plant आहे.
हही बहु उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आपल्या फुलपाखरू उद्यानात हवीच.
तर जाताय ना बाजारात वाघाटी शोधायला. 😊
29) Cassia glauca
30) Senna tora
31) Senna occidentalis
32) Senna obtusifolia
33) Senna auriculata
34) Cassia javanica
Larval Host Plant
Catopsilia pyranthe – Mottled Emigrant
Spindasis vulcanus – Common Silverline
Catopsilia pomona – Lemon Emigrant
Eurema hecabe – Common Grass Yellow
Cassia/ Senna या legume वर्गातील बहुतांश वनस्पती yellow फुलपाखराच्या खाद्य वनस्पती आहेत. या वनस्पतींची लागवड रस्त्याकडेला केली जाते. Cassia javanica सोडले तर बाकी सर्व वनस्पतींना पिवळ्या रंगाची फुले येतात. Cassia javanica ला गुलाबी फुले येतात. संपूर्ण झाड एकदम फुलते फार लवकर वाढणार्या या वनस्पती बहुतेक सर्व नर्सरीत मिळतात. या वनस्पतींना कुंडीत लावावेत. वरील सर्व फुलपाखरू मोठ्या प्रमाणात यावर अंडी घालतात. या फुलपाखराच्या बहुतांश अळ्या पक्षी खाऊन टाकतात. Wasps या एकप्रकार च्या माश्या सुद्धा अळ्या घेऊन जातात.
बिया द्वारे यांची लागवड सहज शक्य आहे.
या वरील फुलपाखरांचा जीवनक्रम अभ्यास करणे फार सोपे आहे फक्त त्यासाठी Cassia वर्गातील झाडांची लागवड केली पाहिजे. 😊
35) Tylophora asthmatica/indica syn Vincetoxicum indicum - अनंतवेल, दम वेल
Larval Host Plant
Parantica aglea – Glassy Tiger
It is mostly found in the sub-himalayan tract from Uttarakhand to Meghalaya and in the central and peninsular India 🇮🇳
In India its traditionally used for the treatment of bronchial asthma, inflammation, bronchitis, allergies, rheumatism and dermatitis.
36) Tylophora dalzelli / Vincetoxicum dalzellii - लहान पीतमारी
Larval Host Plant
Tirumala limniace – Blue Tiger
Danaus chrysippus – Plain Tiger
Parantica aglea – Glassy Tiger
Euploea core – Common Crow
वरील दोन्ही लहान वेल असून यांचा वापर औषधीय आहे.
सर्वसाधारण जंगलातील खुल्या जागेत इतर झुडपांवर वाढतात. पावसाळ्यात भरपूर फुले येतात. याची रोपे औषधी वा आयुर्वेदिक झाडे मिळणार्या नर्सरीत मिळतील. याची रोपे cuttings लावुन सहजपणे करता येतात.
शहरातील बागेत वरील पैकी Glassy Tiger हे फुलपाखरू अंडी घालायला नक्कीच येईल.
आपल्या पाश्चिम घाट जंगलात हमखास आढळते. पावसाळी treak साठी गेलात तर नक्की शोध घ्या 😊
37) Aegle marmelos – Bel
Larval Host Plant
Papilio polytes – Common Mormon
Papilio demoleus – Lime Swallowtail
भारतीय द्वीपकल्प मध्ये आढळणारा हा वृक्ष फार औषधीय आहे. हा हळू वाढणारा काटेरी वृक्ष सर्व प्रकारच्या जमीनीत वाढू शकतो.
आयुर्वेदिक उपचार मध्ये हा antidiarrhoeal, antimicrobial, antiviral, radioprotective, anticancer, chemopreventive, antipyretic, ulcer healing, antigenotoxic, diuretic, antifertility and anti-inflammatory properties साठी वापरतात.
बेल फळ लोक आवडीने खातात, जाम, लोणचे करतात.
याची रोपे बहुतांश नर्सरीत मिळतात.
याची उंची 10 मिटर पर्यंत होऊ शकते त्यामुळे शक्यतो कुंडीत लावा.
Lime Swallowtail या फुलपाखरू साठी हे फेवरेट Host Plant आहे.
38) Capparis sepiaria कंथार/मांसतोडी
Larval Host Plant
Cepora nerissa – Common Gull
Ixias pyrene – Yellow Orange-tip
Ixias marianne – White Orange-tip
Hebomoia glaucippe – Great Orange-tip
Appias libythea - Striped albatross
Belenois aurota – Pioneer
Colotis danae - Crimson tip
भरपूर कांटे असलेली ही वेल कुंपन म्हणून लावली जाते. कोरडे हवामान असलेल्या जागेवर येते. या वनस्पतीना भरपूर फळे लागतात, पक्षी ही फळे आवडीने खातात. बियांपासून रोपे हमखास तयार होतात.
ही वनस्पती फार औषधीय आहे. शुष्क व कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात ही मोठ्याप्रमाणात आढळून येते.
39) Capparis divaricata - पाचुंदा
Larval Host Plant
Belenois aurota – Pioneer
Ixias pyrene – Yellow Orange-tip
Ixias marianne – White Orange-tip
Colotis danae - Crimson tip
याचे काटेरी मोठे झुडुप बनते, काटे फार अनकुचीदार असतात. फुले पिवळीधमक व सुंदर दिसतात. हिरविगार असणारी फळे फळे साधारणतः मे महिन्यात पिऊन लालसर होतात. याची रोपे नर्सरीत उपलब्ध नसतात. कोरडे व दुष्काळी भागात ही वनस्पती मोठ्याप्रमाणात आढळून येते. बियांपासून रोपे सहजपणे तयार होतात.
वाघाटीची (Capparis zeylanica) फळे म्हणून या वनस्पतीची फळे सुद्धा विकली जातात. औषधीय उपयोग म्हणून या वनस्पतींची फळे, मुळे आणि बियांचा वापर होतो.
40) Capparis decidua - पाचुंदा
Larval Host Plant
Colotis etrida – Little Orange-tip
Ixias marianne – White Orange-tip
Cepora nerissa – Common Gull
Belenois aurota – Pioneer
ही झुडपे साधारण 8 -10 फुट वाढतात. काटेरी असतात, पिवळ्या रंगाची फुले येतात त्यावेळी खूप छान दिसतात. या वनस्पतीना पाने नसतात.
याची फळ पावसाळ्यात मिळतात. बिया लगेचच लावावीत बिया वाळल्यास मरतात. यांना वाघाटी असे पण म्हणतात.
41) Capparis moonii
Larval Host Plant
Cepora nadina – Lesser Gull
Hebomoia glaucippe – Great Orange-tip
पाश्चिम घाट परिसरात आढळणारी ही वेल महाकाय होऊ शकते. फुले खुप मोठी, पांढरी आणि सुंदर दिसतात. याची फळ क्रिकेट बॉल एवढी मोठी होतात. पक्षी आवडीने खातात. पूर्वी खूप दिसणारे हे आता दुर्मिळ होत चालले आहे.
42) Capparis grandis
Larval Host Plant
Cepora nadina – Lesser Gull
Ixias marianne – White Orange-tip
The Capparaceae, commonly known as the caper family.
या family मधील जवळपास सर्वच प्रजाती फुलपाखराच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहेत. संपूर्ण भारतात याच्या अनेक प्रजाती आढळतात. बियांपासून यांची लागवड सहज शक्य आहे.
43) Salvadora persica – मिसवाक, Toothbrush Tree
Larval Host Plant
Colotis amata – Small Salmon Arab
Colotis protractus – Blue-spotted Arab
Colotis etrida – Little Orange-tip
Colotis vestalis – White Arab
Chewing sticks have been used for centuries for tooth cleaning, and are recommended by the World Health Organization. Salvadora persica is a promising product and is useful to produce antiplaque, analgesic, anticonvulsant, antibacterial, antimycotic, cytotoxic, antifertility, deobstruent, carminative, diuretic, astringent, and also used in biliousness, and rheumatism.
भारतीय द्वीपकल्प मधील वाळवंटी, कोरड्या प्रदेशात आढळून येणारा हा लहान वृक्ष आयुर्वेदिक उपचार मधे फार महत्त्वपूर्ण मानला जातो. याला लहान लहान लाल रंगाची फळ येतात जी पक्षांना फार आवडतात. याला वाळवंटातील कल्पवृक्ष म्हटले जाते. समुद्र किनाऱ्यावर ही वनस्पती भरपूर आढळते.
Small Salmon Arab या फुलपाखरा साठी तर हे फेवरेट Host Plant आहे.
याची रोपे मिळवणे फार अवघड आहे. कदाचित पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बियांपासूनच रोपे तयार होत असावीत.
Tissues culture करून सुद्धा रोपे तयार करण्यात येतात.
44) Cadaba fruticosa - काळी टाकळी
Larval Host Plant
Belenois aurota – Pioneer
Colotis aurora – Plain Orange-tip
Colotis danae – Crimson-tip
Colotis etrida – Little Orange-tip
Spindasis vulcanus – Common Silverline
Moduza procris – Commander
Cepora nerissa – Common Gull
काळी टाकळी ही भारतीय द्वीपकल्पात प्रदेशानिष्ठ असलेली Capparaceae फॅमिलीतील महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. भारतात गंगेचे खोरे, विंध्य पर्वतरांगा आणि दख्खणचे पठार या ठिकाणीच्या शुष्क प्रदेशात आढळून येते.
The plant is used in the treatment of syphilis, sore and as an antiphlogistic, deobstruent, emmenagogue, anthelmintic.
हे छोटे झुडूप आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. कमी पावसाच्या प्रदेश मध्ये आढळणारी ही वनस्पती सध्या फार दुर्मिळ होत चालली आहे. जानेवारी महिन्यात फुले येतात आणि मे महिन्यात फळे पक्व होतात. बिया द्वारे लागवड सहजपणे करता येते परंतु उगवण क्षमता फार कमी आहे. रोपे सुद्धा हळू हळू वाढतात.
फुलपाखराच्या दृष्टीने हे फार महत्त्वाची वनस्पती आहे. याची लागवड जर आपण केली तर जवळपास 7 प्रजातीच्या फुलपाखरांना आपण आपल्या बागेत आणू शकतो. दुर्मिळ होत असल्याने या वनस्पतीचे सुद्धा संवर्धन होईल.
45) Maerua oblongifolia – Desert Caper हेमकंद
Larval Host Plant
Belenois aurota – Pioneer
Cepora nerissa – Common Gull
Ixias marianne – White Orange-tip
Colotis danae – Crimson-tip
Colotis etrida – Little Orange-tip
Maerua oblongifolia is a low woody bushy under-shrub sometimes scandent to 2–3 meters high, with a thick root stock and thick leaves, and strongly scented flowers, occurring in India, Pakistan, Africa and Saudi Arabia.
Maerua oblongifolia is one of the most commonly used plants to cure various diseases like stomach ache, urinary calculi, diabetes, fever, skin infections, epilepsy, pruritis, cough, abdominal colic.
Maerua oblongifolia हा मोठा वाढणारा वेल आहे. कोरड्या व वाळवंटात आढळणारा हा वेल अधिवास नष्ट होत असल्याने दुर्मिळ होत चालले आहे. जानेवारी महिन्यात सुवासिक फुले येतात आणि एप्रिल मे पर्यंत फळेही तयार होतात.
ही वनस्पती पानावरून ओळखणे कठीण आहे कारण याच्या प्रत्येक वेलीची पाने वेगवगळी असतात., पण फुले फार देखणी आणि unique असतात.
याची रोपे मिळवणे फार मुश्किल आहे फक्त botanists मदत करू शकतील. बिया मिळाल्या तर रोपे तयार करता येतात.
फुलपाखराच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे.
46) Ziziphus jujuba – Jujube, Red date

Castalius rosimon – Common Pierrot
The fruits of Ziziphus jujuba, commonly known as jujube, red date or Chinese date, are taken as fresh or dried food, and as traditional medicine worldwide.
47) Ziziphus mauritiana – Indian plum बोर
Larval Host Plant
Spindasis vulcanus – Common Silverline
Castalius rosimon – Common Pierrot
Tarucus nara – Striped Pierrot
Discolampa ethion – Banded Blue Pierrot
Neptis jumbah – Chestnut-streaked Sailer
Papilio demoleus – Lime Swallowtail
Tarucus callinara – Spotted Pierrot
Tarucus venosus – Veined Pierrot
Tarucus hazara – Dark Violet Pierrot

हे मोठे वाढणारे काटेरी झुडूप भारतात सर्वत्र आढळते. याला लहान चेरी सारखी भरपूर फळे लागतात. याची फळे पक्षी, लोक आवडीने खातात. बियांपासून याची रोपे सहजपणे तयार होतात. याच्या मोठ्या झाडाखाली याची रोपे मिळवणे शक्य आहे. काटेरी असल्याने कुंपणावर, बांधावर ही झुडूप आढळते.
48) Ziziphus oenoplia – Jackal Jujube,
Larval Host Plant
Castalius rosimon – Common Pierrot
Tarucus ananda – Dark Pierrot
Spindasis vulcanus – Common Silverline
Caleta decidia – Angled Pierrot
काटेरी झुडूप, scrub forests मध्ये आढळणारा हा झुडूप बियांपासून रोपे तयार करण्यात येतात.
49) Ziziphus rugosa – Wild Jujube, तोरण
Larval Host Plant
Caleta decidia – Angled Pierrot
Caleta elna – Elbowed Pierrot
Castalius rosimon – Common Pierrot
Catapaecilma major – Common Tinsel
Rapala iarbus – Common Red Flash
Rapala lankana – Malabar Flash
Rapala varuna – Indigo Flash
Cigaritis vulcanus – Common Silverline

हे उंच वाढणारे काटेरी झुडूप जंगलात आढळते. फळे आवडीने खातात. बियांपासून रोपे तयार करण्यात येऊ शकतात.
Ziziphus या गटातील वनस्पती फुलपाखराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. Blues फुलपाखराच्या अनेक प्रजाती यावर अंडी घालतात. याना फुलोरा येतो तेव्हा मधमाश्या खूप येतात मकरंद घ्यायला.
Ziziphus species -
Slate Flash - Rapala manea
50) Aristolochia indica – Sapsada
51) Aristolochia tagala –
Larval Host Plant
Pachliopta aristolochiae – Common Rose
Troides minos – Sahyadri Birdwing
Pachliopta hector – Crimson Rose
Pachliopta pandiyana - Malabar Rose
52) Aristolochia littoralis
Pachliopta aristolochiae – Common Rose
53) Aristolochia bractiata
Pachliopta aristolochiae – Common Rose
Pachliopta hector – Crimson Rose
Aristolochia या बदकवेली संपूर्ण भारतात आढळतात.
या वेलीला फार सुंदर फुले येतात म्हणून यांचा समावेश ornamental plants म्हणुन नर्सरीत केला जातो. वरील पैकी A. indica आणि A. tagala या भारतात आढळतात परंतु या नर्सरीत उपलब्ध होत नाहीत.
या वेलीला बास्केट सारखी फळे येतात त्यात असंख्य बिया असतात. या बिया रुजवणे कठीण असते.
या वेली जर तुम्ही तुमच्या बागेत लागल्या तर Common Rose हे फुलपाखरू हमखास येतात अगदी दाट शहरात जरी तुमची बाग असली तरी.
कोंकणी जंगला जवळील भागात जर Aristolochia indica and Aristolochia tagala या वेली लावल्या तर दक्षिण भारतात आढळणारे सर्वात मोठे फुलपाखरू Sahyadri Birdwing नक्कीच यावर अंडी घालायला येईल.
कोरडे हवामान असलेल्या भागात Aristolochia bractiata हे तण समजले जाणारे वनस्पती जर तुम्ही तुमच्या बागेत आणून लावली तर Common Rose आणि Crimson Rose ही फुलपाखरे हमखास येतील.
54) Cajanus cajan – Pigeon pea तुर
Larval Host Plant
Jamides bochus – Dark Cerulean
Jamides celeno - Common Cerulean
Lampides boeticus – Pea Blue
Catochysops strabo - Forget-me-not
मूळ आशियाई असलेली ही वनस्पती कडधान्य म्हणुन जगभर पसरली आहे. ही वनस्पती वर्षभर रहाते. पिवळ्या रंगाची फुले येतात आणि याच्या शेंगा भाजी करतात.
अखंड तुर डाळ लावुन याची रोपे करणे सहज शक्य आहे.
याचे लहान झुडूप होते त्यामुळे जमिनीत किंवा कुंडीत पण लावू शकता.
वरील पैकी Common Cerulean आणि Pea Blue ही फुलपाखरे यावर अंडी घालायला नक्की येतील.
55) Holostemma annulare / Holostemma ada-kodien - शिदोडी
Larval Host Plant
Danaus genutia – Striped Tiger
Holostemma - The genus was first described in 1810. As presently constituted, the genus contains only one known species, Holostemma ada-kodien, native to southern Asia (China, Nepal, Pakistan, India, Sri Lanka, Myanmar, Thailand).
ही दुर्मिळ संकटग्रस्त आयुर्वेदिक वनस्पती जवळपास 34 पेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधात वापरतात. खूप मोठा होणारा या वेलाची साल फार जाड आणि खडबडीत असते. जंगलातील उघड्या ठिकाणी वाढते. फुले जाड पाकळ्यांची गुलाबी रंगाची असतात. फळे लांबट गोलाकार असतात तर बिया पातळ चापट्या असतात. बियांपासून रोपे सहज तयार करण्यात येतात. दुर्मिळ असल्याने आपण फुलपाखराच्या सोबत या वनस्पतीच्या संरक्षण आणि संवर्धन मध्ये सहभागी होऊ शकतो.
ही वनस्पती मिळवणे मुश्किल असले तरी अशक्य नक्कीच नाही, botanists किंवा जंगलात फिरणारे स्थानिक लोक आपल्याला या कामी मदत करू शकतील.
56) Oxystelma esculentum – दुधाणी
Larval Host Plant
Danaus genutia – Striped Tiger
Euploea mulciber – Striped Blue Crow
Danaus chrysippus – Plain Tiger
Oxystelma esculentum is a species of flowering plant native to China, South Asia, southeast Asia, northeastern Africa, and south-west Asia. The plant is used in traditional medicine and the fruit is eaten.
ही नाजूक वेल नदीकाठी, खुरट्या जंगलात मुबलक प्रमाणात आढळून येते. फार सुंदर अशी गुलाबी रंगाची भरपूर फुले येतात.
याची रोपे बियांपासून करता येते तसेच cuttings लावुन पण सहज करता येतात. तीन प्रजाती चे फुलपाखरू यावर अंडी घालायला येतात.
57) Pergularia daemia – उतरण
Larval Host Plant
Danaus chrysippus – Plain Tiger
It's native range is Tropical & S. Africa, Sinai to Arabian Peninsula, Iran to W. Indo-China.
ही भरपूर वाढणारी वेल उष्ण कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात मुबलक प्रमाणात वाढते. Heart shape पाने असतात आणि याची फळे काटेरी असतात. अनेक ठिकाणी या वेली तण समजून काढून टाकतात. पडीक जमिनीत कमी पाणी असलेल्या जागेवर सुद्धा या वाढतात. बियांपासून रोपे तयार होतात.
अति वृष्टी असलेल्या ठिकाणी या वेली जगत नाहीत.
उतरण वेल जर तुम्ही तुमच्या बागेत लावली तर Plain Tiger हे सुंदर फुलपाखरू नक्की तुमच्या बागेत येईल व आपले जीवनक्रम पूर्ण करेल.
58) Wattakaka volubilis / Dregea volubilis हरणदोडी
Larval Host Plant
Tirumala limniace – Blue Tiger
Tirumala septentrionis – Dark Blue Tiger
Native to : Andaman Is., Bangladesh, Cambodia, China South-Central, China, India, Jawa, Laos, Malaya, Myanmar, Nepal, Nicobar Is., Pakistan, Philippines, Sri Lanka, Taiwan, Thailand, Vietnam
ही पांढरा चिक असलेली वेल फार मोठी वाढते. या हरणदोडी वेलीला हिरव्या रंगाची फुले येतात. काही ठिकाणी या फुलांची भाजी सुद्धा केली जाते. याची फळे लांबट गोलाकार असतात, बिया चापट्या आणि हलक्या असतात. बिया द्वारे याची रोपे सहजपणे करता येतात.
ही वेल जर तुम्ही तुमच्या बागेत लावाल तर Blue Tiger हे फुलपाखरू अगदी दाट शहर वस्तीत सुद्धा येऊन यावर अंडी घालतात. याची मादी भरपूर अंडी घालते आणि खूप फुलपाखरे तयार होतात. या वनस्पती चा चिक कीटकांना विषारी असल्याने यावर वाढणार्या आळ्या पण विषारी बनतात त्यामुळे पक्षी खात नाहीत.
याचा जीवनक्रम अभ्यास करणे फार मजेशीर आहे.
ही वेल मिळवणे जरा अवघडच आहे. कोकणात याची भाजी करतात त्यांना ही वनस्पती सहज उपलब्ध होऊ शकते.
59) Mussaenda frondosa – भूतकेश
Larval Host Plant
Moduza procris – Commander
Native to India: Assam, Meghalaya, Sikkim; Sri Lanka, Nepal.
In India Western Ghats, Moist Deciduous to Evergreen Forests. Endemic to Peninsular India
हे लहान झुडूप कोकणात सर्वत्र आढळते. याची फुले केशरी रंगाची असतात पण एक पाकळी फार मोठी पांढर्या रंगाची असते. ईतर झुडपांच्या साहाय्याने हे झुडूप उंच उंच वाढते. यावर अनेक फुलपाखरे nectar घ्यायला सुद्धा येतात. याला एप्रिल ते नोव्हेंबर फुले येतात व लहान बेरी सारखी फळेही येतात. बियांपासून रोपे तयार करता येतात तसेच cuttings लावुन पण सहज रोपे तयार होतात.
ज्या भागात Commander हे फुलपाखरू आढळते तेथे या वनस्पती वर हे फुलपाखरू हमखास अंडी घालायला येते.
60) Mussaenda erythrophylla –
Larval Host Plant
Moduza procris – Commander
हे झुडूप वर्गातील वनस्पती नर्सरीत मिळेल. ज्या भागात Commander हे फुलपाखरू आढळते तेथे या वनस्पती वर हे फुलपाखरू हमखास अंडी घालायला येते.
61) Aurorae' philippica Mussaenda –

62) Mangifera indica Linn – Mango, आंबा
Larval Host Plant
Anthene emolus – Common Ciliate Blue
Cheritra freja – Common Imperial
Horaga onyx – Common Onyx
Horaga viola – Brown Onyx
Rapala manea – Slate Flash
Rathinda amor – Monkey Puzzle
Euthalia aconthea – Common Baron
Euthalia anosia – Grey Baron
Euthalia phemius – White-edged Blue Baron
Symphaedra nais – Baronet
Chilades lajus - Indian Lime Blue - unusual Host plant
मूळ आशियाई असलेला हा लोकप्रिय वृक्ष फार मोठा होतो. जवळपास 15 ते 30 मिटर उंच वाढणारा ,दाट सावली देणारा हा सदाहरित वृक्ष आहे. आंबा जगभर प्रसिद्ध आहेच पण हा वृक्ष आयुर्वेद मध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे.
खूप मोठा होत असल्याने कुंडीत लावावेत, याच्या कोवळ्या पानावर Common Baron हे फुलपाखरू अगदी दाट शहरातील बागेत देखील हमखास अंडी घालायला येते. फार उंच झाडे अंडी घालायला निवडली जात नाही. या फुलपाखराच्या आळ्या पानाशी एवढ्या एकरूप होऊन जातात की त्यांना ओळखणे कठीण असते. या आळ्या जरी काटेरी असल्या तरी त्या पलंगाच्या आळ्या प्रमाणे वेदनादायक नसतात. अनेक जण या आळ्या गैरसमजाने काढून टाकतात.
इतर फुलपाखरे ज्या भागात आढळतात तेथे या वृक्ष खाद्य वनस्पती म्हणून वापरतात.
कुंडीत जेव्हा हा वृक्ष फार मोठा होईल तेव्हा तो जमिनीत लावावा किंवा इतरांना द्यावा म्हणजे त्याचे संवर्धन होईल.
63) Bambusa arundinacea –
Larval Host Plant
Halpe hindu – Sahyadri Banded Ace
Thoressa honorei – Sahyadri Orange Ace
Melanitis leda – Common Evening Brown
Melanitis zitenius – Great Evening Brown
Lethe drypetis – Two-eyed Treebrown
Lethe europa – Bamboo Treebrown
Iambrix salsala – Chestnut Bob
Matapa aria – Common Branded Redeye
The giant thorny bamboo, Indian thorny bamboo, spiny bamboo, or thorny bamboo, is a species of clumping bamboo native to southern Asia. It is also naturalized in Seychelles, Central America, West Indies, Java, Malaysia, Maluku, and the Philippines.
ही बांबूची प्रजाती भारतात सर्वत्र आढळते, काटेरी असणारी ही वनस्पती सरळ 40 फूट उंच वाढते. याचे कोंब भाजी करतात. याला आयुष्यात एकदाच फुले येतात आणि मग ते मरून जाते. बियांपासून याची रोपे तयार करण्यात येतात तसेच cuttings लावुन पण सहज रोपे तयार होतात. याचे मोठे बेट तयार होते त्यामुळे खूप जागा असेल तरच जमिनीत लावा अन्यथा कुंडीत सुद्धा चांगले वाढते.
आपल्या फुलपाखरू उद्यानात एखादे बांबू चे बेट नक्कीच असावे.
64) Cinnamomum camphora – कापूर
Larval Host Plant
Papilio epycides – Lesser Mime
Graphium sarpedon – Common Bluebottle
Papilio slateri – Blue-striped Mime
Papilio clytia – Common Mime
Camphor Tree is native to China, Japan, Korea, Taiwan, and adjacent parts of East Asia. It is now cultivated in many parts of the world.
15 ते 20 मिटर उंच वाढणारा हा वृक्षला glossy waxy पाने असतात. नवीन आलेली पाने लालसर रंगाची असतात.
Widely cultivated as a street and garden tree, C. camphora is cultivated for camphor, which is used as a culinary spice, a component of incense, and as a medicine. Camphor is also an insect repellent and a flea-killing substance.
65) Cinnamomum verum – दालचिनी
Larval Host Plant
Papilio clytia – Common Mime
Cinnamomum verum –
Graphium teredon – Narrow-banded Bluebottle
Cinnamon is a small evergreen tree 10–15 meters tall, native to Sri Lanka and South India. The bark is widely used as a spice due to its distinct odour. In India it is also known as "Daalchini".
66) Cinnamomum tamala – Indian Bay Leaf - तमालपत्र
Larval Host Plant
Papilio clytia – Common Mime
Cinnamomum tamala is an evergreen tree growing 10 - 20 metres tall. A popular spice in India and where the plant is harvested from the wild and also often cultivated. The bark and leaves, which are sources of essential oils, are the parts mainly used and they also have medicinal properties. The leaves are often sold as a spice called 'tamala patra' in local markets and the tree is cultivated for its leaves and essential oils in parts of India.
वरील तिन्ही वृक्ष ज्या ठिकाणी संबंधित फुलपाखरू आढळतात तेथेच लावावेत उदा कोकण.
67) Caesalpinia pulcherrima – Shankasur Orange / Peacock Flower / केशरी शंकासुर
Larval Host Plant
Eurema hecabe – Common Grass Yellow
Charaxes solon – Black Rajah
हे शोभिवंत म्हणुन जगभर पसरलेला लहान झुडूप वर्गातील आहे याचे मूळस्थान वेस्ट इंडीज समजलं जातं परंतु काही botanists याला एशियन समजतात.
अत्यंत देखणी फुले असलेला हा झाड बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनीत आरामात वाढतो. बियांपासून सहजपणे रोपे तयार होतात. या वनस्पती खाली याची अनेक रोपे तयार होतात व ती उपटून आणली तर सहज जगतात.
रस्त्याकडेला तसेच बागेत शोभिवंत वनस्पती म्हणुन सर्वत्र लावला आहे. या वनस्पतींना मोठ्या कुंडीत लावले तरी चालेल.
68) Hemidesmus indicus – Indian Sarsaparilla - अनंतवेल
Larval Host Plant
Euploea core – Common Crow
मूळ भारतीय असलेली ही वेल वर्गातील वनौषधी आहे. याला कंदमुळ सारखे मुळे असतात. वर्षभर मूळ जमिनीत सुप्तावस्थेत असते आणि पावसाळ्यापूर्वी त्याला फुटवे फुटतात. ही वेल जमिनीवर पसरते किंवा ईतर झाडांच्या आधाराने वर वाढते.
The root is an Ayurvedic herb (Anant Mool, also known as Krishna powder and Indian Sarsaparilla). It is a depurative and tonic that is used to treat patients with chronic skin disease and other conditions such as cough, genitourinary disease, and rheumatism.
काही ठिकाणी अनंतवेल हे Common Crow चे फेवरेट Host Plant आहे.
कोकणात, घाटावर हे अगदी सर्वत्र जंगलात, शेतातील बांधावर, मोकळ्या जागेत आढळते. याचे मूळ जमिनीत खुप खोलवर असते त्यामुळे उपटून आणणे शक्य नाही, जमीन खोलवर खोदूनच काढावा लागतो. मूळ लावले तर सहज रोप तयार होते.
69) Glycosmis pentaphylla -
Larval Host Plant
Chilades lajus – Lime Blue
Neopithecops zalmora – Common Quaker
Papilio castor – Common Raven
Papilio demoleus – Lime Swallowtail
Papilio dravidarum – Malabar Raven
Papilio helenus – Red Helen
Papilio polymnestor – Blue Mormon
Papilio polytes – Common Mormon
Occurs in Southeast Asia and northern Australia.
हे लहान झुडूप पाश्चिम घाट मध्ये सर्वत्र आढळते, साधारण पणे 2 मिटर उंची असलेल्या या झुडूपला बेरी सारखी फळेही येतात जी पक्ष्यांना फार आवडतात. याची पाने कुस्करली असता punjant वास येतो. या झुडपांच्या खाली याची भरपूर रोपे आलेली असतात ती उपटून आणली तर सहज लागु होतात. जवळपास 7 प्रजातीच्या फुलपाखराचे ही खाद्य वनस्पती आहे. शहरात Common Mormon Blue Mormon ही फुलपाखरे सहज हे झुडूप स्विकारताना आढळून आले आहे. जंगल भागात बाकीच्या फुलपाखराचे यावर जीवनक्रम आढळून आले आहे.
हे कोणत्याही nursery मध्ये मिळत नाही त्यासाठी जंगलात जावे लागेल.
70) Miliusa tomentosa – हुंब
Larval Host Plant
Charaxes psaphon – Plain Tawny Rajah
Graphium nomius – Spot Swordtail
Graphium doson – Common Jay
Graphium teredon – Narrow-banded Bluebottle
Native to: India, Nepal, Sri Lanka
भारतीय द्वीपकल्पात सर्वत्र आढळून येणारा हा वृक्ष फार मोठा होतो. हा वृक्ष nursery मध्ये मिळत नाही.
71) Caesalpinia bonduc – गजगा

Charaxes bharata – Indian Nawab
72) Acacia catechu – खैर
Larval Host Plant
Azanus ubaldus – Bright Babul Blue
Charaxes agrarius – Anomalous Nawab
Azanus jesous – African Babul Blue
Prosotas nora – Common Lineblue
Prosotas dubiosa – Tailless Lineblue
Charaxes bharata - Common Nawab
73) Xylia xylocarpa – जांभा
Larval Host Plant
Coladenia indrani – Tricolour Pied Flat
Rapala iarbus – Common Red Flash
Cheritra freja – Common Imperial
Curetis thetis – Indian Sunbeam
Arhopala amantes – Large Oakblue
74) Murraya paniculata – Orange jessamine, Satinwood, कुंती
Larval Host Plant
Papilio polytes – Common Mormon
Chilades lajus – Lime Blues
हे लहान वृक्ष फार प्रसिद्ध आहे. कोकणात याचे प्रमाण जास्त आहे. काही नर्सरीत याची रोपे मिळतात.
75) Ravenia spectabilis -
Larval Host Plant
Papilio polytes - Common Mormon
Papilio demoleus - Lime Swallowtail
हे विदेशी शोभिवंत झुडूप भारतात उद्यानात लागले आहे आणि नवीन अभ्यासात वरील दोन फुलपाखरे यावर आपले जीवनक्रम पूर्ण करत आहेत. आता याचा butterfly host plant च्या यादीत अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
76) Palm species - Arenga spp. – Lucky Palm
Larval Host Plant
Elymnias hypermnestra – Common Palmfly
Suastus gremius – Oriental Palm Bob
Elymnias caudata – Tailed Palmfly
Palm वर्गातील बरेच झाडे वरील फुलपाखराच्या खाद्य वनस्पती आहेत. नर्सरीत खूप प्रजातीचे palm मिळतात. त्या पैकी बरेच फुलपाखराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आपल्या फुलपाखरू बागेत एखादा कोपरा जर फक्त Palms लावुन भरगच्च केला तर ही फुलपाखरे नक्की येतील. आणखीन तुमच्या बागेला शोभा पण येईल.
77) Cullen corylifolium / Psoralea corylifolia - बावची
Larval Host Plant
Papilio demoleus – Lime Swallowtail
Native range is NE. Tropical Africa, S. Arabian Peninsula, Tropical & Subtropical Asia.
Used in Indian and Chinese traditional medicine.
हे वार्षिक वनस्पती खुल्या पडीक जमिनीत भरपूर प्रमाणात उगवते. यावर Lime Swallowtail हे फुलपाखरू हमखास अंडी घालायला येते. ही वनस्पती नर्सरीत मिळत नाही. बियांपासून सहजपणे रोपे तयार करता येतात.
हे लहान झुडूप वनस्पती वार्षिक असल्याने दरवर्षी बिया साठवून ठेवाव्यात व लागवड करावी लागते.
78) Limonia acidissima – Wood Apple - कवठ
Larval Host Plant
Papilio demoleus – Lime Swallowtail
Virachola isocrates – Common Guava Blue
Papilio bianor – Common Peacock
Limonia acidissima is native to India (including the Andaman Islands), Bangladesh, and Sri Lanka.
हा विशालकाय वृक्ष फळ झाड म्हणुन लागवड केला जातो. याची रोपे फुलझाडांच नर्सरीत मिळतात. फार मोठा होत असल्याने कुंडीत लावावा. Lime Swallowtail हे फुलपाखरू अगदी शहरात सुद्धा यावर अंडी घालते.
79) Schleichera oleosa – कुसुंब
Larval Host Plant
Acytolepis puspa – Common Hedge Blue
Rathinda amor – Monkey Puzzle
Catochrysops strabo – Forget-me-not
Rapala iarbus – Common Red Flash
Arhopala centaurus – Centaur Oakblue
Native to India, Ceylon, Burma, Thailand, Indo-China, Malaysia.
हा फार मोठा होणारा वृक्ष त्याच्या लालभडक रंगाच्या पानांमुळे जंगलात चटकन लक्षात येतो.
काही नर्सरीत क्वचितच मिळतो.
80) Abrus precatorius – Rosary Pea - गुंज
Larval Host Plant
Jamides celeno – Common Cerulean
Curetis thetis – Indian Sunbeam
Lampides boeticus – Pea Blue
Native to India and tropical Asia.
ही वेल भारतात खुल्या जंगलात, पानगळ जंगलात आढळते. पाला मसाला पान मध्ये वापरतात. गुंज बिया फार आयुर्वेदिक आहेत.
मूख रोग वातनाशक बलदायक यासाठी उपयोग होतो. परंतु बिया विषारी असतात. बर्याच नर्सरीत रोपे मिळतात. वरील फुलपाखराच्या आळ्या या वेलीची फुले खातात त्यामुळे सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत. ही वेल आपण कुंडीत किंवा जमिनीत सुद्धा लावू शकतो. या वेलीची पाने आपण खाऊ शकतो.

Comments
Post a Comment