गजराज
Guess what I'm holding 🤔🤪 गेल्या आठवड्यात श्रुती, नागालैंड गर्ल अचानक घरी भेटायला आली. अनेक विषयांतर चर्चा करना करता अचानक प्रवीण कडे वानोशी फाॅरेस्ट होम स्टे ला जायचच असा हट्ट केली. म्हटल 'जाऊ या' तस ती 2018 पासून पाठी लागली होती. वानोशी फुल्ल बुकिंग असल्यामुळे शनिवार-रविवार ऐवजी रविवार -सोमवार ठरले. तेथे कॅमेरा ट्रॅप लावायचे असल्याने अमितला सोबत घेतले. रविवारी पहाटे सहा वाजताच कोल्हापूर सोडले. चंदगडला मस्त पैकी नाष्टा करून पारगड फाट्याला पक्षितज्ञ अजित पाटलांना भेटलो. थोडेफार पक्षी विषयक चर्चा करून तिलारी गाठले. तेथे लष्कर पाइंटला साइट सिईंग करून घाट उतरलो. घाट संपल्यावर सपाट पण वळणावळणाचा रस्ता लागला. साधारणत दहा वाजले होते, एका ओढ्याच्या पुलावर थांबलो होतो तेथे प्रवीण सातोसकर हा दोडमार्ग मधील सर्वोत्कृष्ट पक्षी निरिक्षक भेटला. चर्चा करत असताना तो बोलला या ओढ्यांत थोडे पुढे चालत गेलात की तेथे एका वडाच्या झाडाला फळे लागलीत, खुप प्रकारचे पक्षी आलेत ते खायला. मग काय घुसलो त्या ओढ्यात!!! मी, श्रुती, तिची बहीण श्...