जंगलाचे आरोग्य
जंगलाचे आरोग्य खुप वर्षांपासून जंगलात जाण्याचा योग आला नव्हता. जबर इच्छा होती जंगलात चालत फिरायची. मग काय लावला फोन धनंजयला म्हटल "जंगलात जाऊया चल " तर लगेच तयार झाला म्हटला "या सोमवारी जाऊया " कामाच्या नादात मी विसरून गेलो पण रविवारी मॅच संपल्यावर पठ्ठ्याचा फोन "ऊद्या जायच नव्ह? " मी जरा उदासीचेच बोललो "बघू" तर म्हणतय कसा "मी आणखीन दोघांना तयार केलय जर तुम्ही कॅन्सल केल तर तुम्हाला आमच्या संपूर्ण ट्रीपचा खर्च द्यावा लागेल." मी पैश्याला तसा मुलखाचा चिकट नाईलाजाने म्हटल "येतो उद्या" सोमवारी सकाळीच तीघे जण दारात गाडी घेऊन हजर, मी विचारल्यावर धनंजय बोलला मुडागडला जायचय. तस मी घाबरतच म्हटल फार चालाव तर लागणार नाही ना? तसा धनंजय बोलला बसा गाडीत दोन-तीन तासाचा ट्रेक आहे, थोडीफार चढाई आहे पण जंगल मस्त आहे. मी शुज चढवून गुमान बसलो गाडीत. मजल दरमजल करत बाजारभोगाव मधे पोहोचलो. तेथे 'गुडलक सोन्या' या नावाचे एक छोटेखानी हाॅटेल आहे. गेली 25 वर्ष तेथे अल्पोपहार करतोय वडापाव, मिर्ची भजी, मिसळ, कटवडा, कांदापोहे, शिरा. सगळे...
Comments
Post a Comment