मत्स्यपुराण

 पहिल्यांदाच मासे पाळणाऱ्यांसाठी /

नवीन अक्वेरीयम टॅन्क घेणाऱ्यांसाठी महत्वाच्या सुचना

• माशांच्या असंख्य प्रजाती आहेत. तुम्हास कोणते व किती मासे पाळायचे आहेत ते आधीच ठरवा.  त्यानुसार योग्य अश्या आकाराची पेटी बनवून घ्या.
• प्रजातीनुसार माशांचे स्वभाव वेगवेगळे असतात.  सोशल, सामाजिक, वाईल्ड, आक्रामक, एकलकोंडे इ इ.  सर्वच मासे ऐकमेकांसोबत राहू शकत नाहीत.
• प्रजातीनुसार माशांना पेटीत दगड, वाळू, लाकूड, पाणवनस्पती वा पुर्णपणे मोकळी पेटी आवश्यक असते.
• काच पेटी योग्य जाडीच्या फोम/रबर अथवा थर्मोकोल शीटवर ठेवने आवश्यक आहे.
• पेटी थेट सुर्य प्रकाश येईल अश्या ठिकाणी ठेऊ नये, वारंवार शेवाळ येऊन पाणी हिरवे होते.
• नवीन पेटी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. साबण, शॅम्पू अजिबात वापरू नका.
• पेटी वरून 1 - 1.5 इंच सोडून पाण्याने पुर्ण भरा.  काही प्रजातीचे मासे पाण्या बाहेर उडी मारतात म्हणून शक्यतो पेटीस कव्हर बसवून घ्या.  दगड, वाळू, लाकूड, झाडे इ इ चे जे काही सेटअप करणार असाल तर ते करून घ्या.
• चांगले दिसतात म्हणून समुद्र किनाऱ्यावरून आणलेले शंख, शिंपले, प्रवाळ पेटीत ठेऊ नका. त्याने पाण्यात कॅल्शियम वाढून pH वाढतो जो बहुतांश माश्यांना धोकादायक असतो.
• पेटी सोबत लगेच मासे घ्यायची गडबड करू नका.  नवीन पेटीत पाणी भरून 3-5 दिवस फिल्टर, एअर पंप लावून चालू करून ठेवा.  यामुळे पाण्यात बेनिफिशियल बॅक्टेरीया तयार होतात जे माश्यांना फार आवश्यक असतात. तसेच पाण्यात जर क्लोरीन असेल तर तो देखील उडून जातो.
• नवीन पाण्यात खास करून मुनसिपाल्टीच्या नळाच्या पाण्यातील अतिरिक्त क्लोरीन मुळे बहुतांश मासे लगेचच मरतात वा आजारी पडून थोड्या दिवसात मरतात.
• दुकानात मासे निवडताना स्वस्थ, निरोगी असे योग्यरित्या Quarantine केलेलेच मासे घ्या वा घरात स्वतंत्र पेटीत स्वतःच Quarantine करा.
• नवीन मासे घरी आणल्या नंतर मासे लगेचच पेटीत सोडू नका. असे केल्याने मासे स्ट्रेस मधे जातात. पिशवीसकट मासे  पेटीतील पाण्यात 15-20 मिनिटे ठेवा. यामुळे पेटीतील पाणी आणि पिशवीतील पाणी यांचे तापमान सारखे होईल.  मगच मासे पेटीत सोडा. याला Acclimatisation असे म्हटले जाते.
• माश्यांचे आरोग्य, रंग, सक्रियता खाद्यावर अवलंबून असते. पुरेसे प्रोटीनयुक्त खाद्यच वापरा. प्रजातीनुसार माशांना वेगवेगळे खाद्य लागते. त्याची माहिती घ्या.  एकाच प्रकारचे खाद्य खाऊन मासे कंटाळतात त्याना दोन-तीन प्रकारचे खाद्य द्या.
• कधीही माश्यांना अति खाद्य देऊ नका. दोन-तीन मिनिटात संपेल इतकच खाद्य दिवसातून दोन वेळा द्या.
▪︎ खाद्याचे पाकिट एक दोन महिन्यात संपेल इतकेच घ्या कारण ते एकदा का खोलले की हवामाना नुसार लवकरच खराब व्हायला लागते.  
• आठवड्यात एकदा तरी माश्यांना उपवास घडवा.
• जास्त खाल्याने मासे लवकर वाढतात हा एक फार मोठा गैरसमज आहे, उलट मासे आळशी व बेढब होतात.
• अतिरिक्त खाद्य पेटीत कुजून अमोनिया तयार होतो, ऑक्सीजन कमी होते, पाण्यास दुर्गंधयुक्त वास येऊ लागतो.  जो माशांना धोकादायक असतो.
• अतिरिक्त खाद्य हे बहुतांश नवीन मासे पाळणार्याचे मासे मरण्याचे मुख्य कारण आहे.
• पेटीतील पाणी कधी आणि कसे बदलायचे हे फार महत्त्वपूर्ण आहे.  पेटीतील संपुर्ण पाणी कधीच बदलू नये   मासे हमखास मरतात. दर पंधरा-वीस दिवसात 30%-40% इतकेच पाणी बदलावे.  यासाठी सायफन पंप वा पाईपचा वापर करून पेटीत खाली जमलेली घाण काढावी.
• फिल्टर मधील स्पंज स्वच्छ पाण्यात धुऊन पुन्हा बसवावा.
• पेटीतील दगड, लाकूड इ बाहेर काढून धुवू नये.  त्यावरील उपयुक्त जीवाणु नष्ट होतात. वाळूतील घाण काढण्यासाठी खास सायफन पंप मिळतो.
• पाणी बदलते वेळी कधीही मासे पेटीतून बाहेर काढू नये, याने मासे हमखास मरतात.
• तुमच्या पेटीतील फिल्टर सिस्टम जितकी चांगली तितके तुमचे मासे स्वस्थ आणि सक्रिय राहतात. 
• Surface agitation



• तुमच्या माशांच्या वागणुकीत, पोहण्याच्या पद्धतीत फरक पडला तर त्वरित योग्य व्यक्तीशी संपर्क करा.
• पाण्यातील अमोनिया pH याची वरचेवर टेस्ट करून घ्या
• प्रजातीनुसार उन्हाळा व हिवाळ्यात माश्यांवर तापमानाचा परिणाम होतो म्हणून थर्मामीटर व हिटरचा वापर करा.
• पेटीतील पाण्यात हात घालण्या पुर्वी लाईट, हिटर, फिल्टर इ इलेक्ट्रिक उपकरणे बंद करून वायर प्लग मधून काढा.
• सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही जे मासे पाळताय त्यांची पुर्ण शास्त्रीय माहीती घ्या. त्यांचा आकार, वयोमान, खाद्य, तापमान, वातावरण, माशांना होणारे आजार, परजीवी, pH, इ इ

मासे पाळा मासे जगवा
मासे पाळा आनंदी रहा

मासे पाळने, पाहणे, निरीक्षण करने, त्यांचे संगोपण करने इ मुळे उच्च रक्तदाब, मानसिक ताणतणाव
कमी होऊन घरात सकारात्मक वातावरण राहते

अधिक माहिती साठी संपर्क
Aqua Villa
कोल्हापूर
8830270374

Comments

Popular posts from this blog

जंगलाचे आरोग्य

Amazing Amboli

Butterfly Garden Layout