रानमोडी Chromolaena odorata, Eupatorium odoratum

 रानमोडी

Chromolaena odorata,
Eupatorium odoratum

रानमोडी ही उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय वनस्पती आहे.  मुळची अमेरिकन असलेली ही वनस्पती दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळते. अतिशय उपद्रवी अशी ही वनस्पती आशिया, आफ्रिका खंडात आगंतुक पणे पसरली आहे. जगभर ही वनस्पती सर्वात घातक तण म्हणून गणली जाते.  ऑस्ट्रेलिया, अमेरिका, हवाई या देशांनी ही कुप्रसिद्ध वनस्पती प्रतिबंधित केली आहे.

2 ते 3 मिटर उंच वाढणारी ही झुडूप वर्गातील वनस्पती झपाट्याने वाढत जाते.  ही वनस्पती विविध प्रकारच्या जमिनीत, वातावरणा मध्ये सहजपणे वाढते. अगदी 1500mm पाऊस पडणाऱ्या ठिकाणी आणि 500mm पेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी पण तग धरून रहाते.  20॰ C पासून 45॰C तापमानात आरामात वाढते.  फक्त दाट जंगलात आणि अति उंच ठिकाणी वाढत नाही.
जंगलातील खुल्या जागा, जंगलाबाहेरच्या जमिनीत, शेतातील बांधावर, पडीक जमिनीत ही झपाट्याने पसरते.
जेथे ही वनस्पती वाढते तेथे ती अत्यंत दाट झाडी तयार करते त्यामुळे तेथील स्थानिक वनस्पती घुसमटुन जातात. ही वनस्पती घनदाट होऊन जाते त्यामुळे या वनस्पती खालील इतर अनेक वनस्पती ऊन, जमिनीतील nutrient अभावी मरून जातात.  स्पर्धा आणि allelopathic इफेक्टस् मुळे मग नामशेष होतात.  त्यामुळेच या वनस्पतीला रानमोडी असे अनेक ठिकाणी म्हंटले जाते.  जवळपास मोठी झाडे असतील तर ही वनस्पती त्या झाडांच्या आधाराने अगदी 6 मिटर उंची गाठू शकते.
ज्या ज्या ठिकाणी या वनस्पती चा उपद्रव आहे तेथील शेतकर्‍यांना तर ही वनस्पती एक शाप आहे.  शेतातील बांधावर, पिकांमध्ये ही झपाट्याने वाढत जाते, पिकांना दिलेली खते, पाणी हीच वनस्पती शोषून घेते. परिणामी शेतकर्‍यांचा पिकांना फटका बसतो. त्यांचे उत्पन्न घटते.
Odorata नावाप्रमाणेच या वनस्पतीला उग्र वास असतो. ही वनस्पती विषारी आहेत त्यात नॉर्मल वनस्पती पेक्षा 5-6 पटीने जास्त Nitrates असतात.  त्यामुळे आपल्याकडील कोणतेही वन्य प्राणी तसेच पाळीव प्राणी या वनस्पतीला तोंडही लावत नाहीत.
अशी ही अजातशत्रू वनस्पती आपल्या देशात उच्छाद माजवत आहे, विशेषतः कोकणात तर हिने फारच आक्रमण केले आहे.
ही वनस्पती perennial आहे. या वनस्पतींना खालून नेहमी भरपूर फुटवे फुटतात त्यामुळे ही जोमाने पसरत जाते. याची मुळे तंतूमय असतात आणि जमिनीत फारशी खोलवर जात नाहीत.
जेव्हा यांना फुलोरा येतो तेव्हा प्रत्येक फांदीला शेंड्यावर असंख्य फुले येतात. संपूर्ण झुडूप फुलांनी झाकून जाते.   फुले लहान साधारण 4mn आकाराची पांढरट निळसर रंगाची असतात.  बिया 3-5 mm लांबट असतात, Seed production is prolific with estimates up to 260,000 m-2.
बियांची उगवण क्षमता जवळपास 25-45% इतकी आहे.  बिया 5 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. या बिया हवे मार्फत प्रसारीत होतात. त्याच बरोबर प्राण्यांच्या केस, पंख, कपडे इत्यादी मुळे पण पसरतात.  बियांपासून तयार झालेले झुडूप एका वर्षातच प्रजननक्षम होऊन नवीन बिया तयार करू लागते.
ही वनस्पती अगदी मुळालगत तोडली किंवा आग लागून संपूर्ण जाळली तरी मरत नाही, लवकरच तिला भरपूर नवीन फुटवे येतात.
भारतात याची पहिली नोंद कोलकाता येथे करण्यात आली आहे.  अर्थ moving मशीन, अवजड वाहनांची वाहतूक, जनावरांची वाहतूक यामुळे बघताबघता संपूर्ण भारतभर ही पसरली असा प्राथमिक अंदाज आहे.
Chromolaena odorata मुळे त्वचा रोग होतात, अनेकांसाठी allergies मुळे asthma जन्य रोग होतात.  कडक उन्हाळ्यात जेव्हा ही वनस्पती वाळते  तेव्हा ते firewood चे काम करते त्यामुळे जंगलात लागणारे वणवे अधिकच भडकतात.  याचा धूराने डोळे जळजळतात म्हणुन स्वैपाक करण्यासाठी कोणीही या वनस्पतीचा जळण म्हणून वापर करत नाही. 
ही वनस्पती ज्या ज्या ठिकाणी पसरते तेथील नैसर्गिक पर्यावरण संपूर्ण बदलून टाकते.  तेथील जैवविविधतेचा समतोल बिघडत जातो. त्यामुळेच ही वनस्पती एक भयंकर आपत्ती आहे,  ही वेळीच उखडून टाकली पाहिजे.
या वनस्पतींना नैसर्गिक कोणतेही शत्रू नाहीत, केमिकल्स वापरून याचा बंदोबस्त करणे निसर्गासाठी आणखीन जास्त धोकादायक आहे. 
Pareuchaetes pseudoinsulata व  stem gall fly Cecidochares connexa वापरून Biological control करण्याचे प्रयत्न काही देशांमध्ये केले गेले परंतु ते फारसे परिणामकारक नाही सिद्ध झाले. आणि हे नवीन biological agents आणून आपल्या निसर्गात सोडणे कदाचित इतर वनस्पतींना धोकादायक ठरू शकते.
त्यामुळे प्रत्यक्ष वनस्पती काढून टाकणे हेच परिणामकारक आहे. या वनस्पतीची  लहान लहान रोपे उपटून टाकणे  हा सगळ्यात चांगला मार्ग. या वनस्पतींची मुळे तंतूमय असल्याने व जमिनीत फार खोलवर जात नसल्याने उपटने थोडेफार  सोपे जाते. 
कोंकणात या वनस्पतींना उपयुक्त वातावरण असल्याने ही वनस्पती फार जोमाने पसरत आहे. त्यातच कोंकणात खाजगी जंगल खुप आहे  व ते दर 5-7 वर्षांत कोळसा करण्यासाठी तोडले जाते त्यामुळे रानमोडीला पसरायला आयते कुरण मिळते. तसेच तेथे पुढील 5-6 वर्षांत जे नवीन जंगल पुन्हा तयार होत होते ती प्रक्रिया रानमोडीच्या उपद्रवामुळे थांबत आहे.
रबर Plantation, केळी Plantation,  अननस Plantation मुळे आधीच कोंकणातील जंगल झपाट्याने कमी होत आहे. त्यात भरीस भर म्हणून मोठ्या प्रमाणावर जंगल तोडून काजू Plantation फार जोरात सुरू आहे.
रबर, केळी आणि अननस च्या बागा केरळी लोक जवळपास वर्षभर फार स्वच्छ, साफ ठेवतात परंतु काजू बागा  वर्षभर अजिबात साफ करत नाहीत त्यामुळे तेथे रानमोडी फारच वाढलेली आहे. 
कोंकणात जे काही खाजगी जंगल, रिजर्व फाॅरेस्ट आणि देवराया शिल्लक आहेत त्या चोहो बाजूने रानमोडीने वेढल्या जात आहेत. तसेच आता रानमोडी दाट जंगलातील गवताळ प्रदेशही काबिज करत आहे परिणामी तृणभक्षक प्राणी खाद्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतांवर आक्रमण करत आहेत. त्यामुळे वन्यजीव व मानव संघर्ष वाढत चालला आहे. 
आता वेळ आलीय काहीतरी करण्याची, ही वनस्पती  समुळ निर्मूलन करायची, उच्चाटन करायची.
ही वनस्पती समुळ नष्ट करायची असेल तर तिला फुलोरा येण्या आधीच तिचा नायनाट करावा लागेल.  आपल्या कडे साधारण पणे ऑक्टोबर नंतर रानमोडी ला फुलोरा येतो.
यासाठी आपल्याला आपल्या गावाजवळ या वनस्पतीचा  उपद्रव असलेले जंगल, देवराई, गवताळ प्रदेश शोधून तेथे रानमोडी निर्मूलन उपक्रम काही वर्षे सलग राबवावा लागेल.
दर 2-3 महिन्यानी याची नवीन आलेली रोपे उपटून टाकणे हा एक प्रभावी उपाय आहे.  नवीन आलेली रोपे उपटून काढणे फार सोपे आहे.
या करिता स्वयंसेवी संस्था, वनविभाग, ग्राम विकास समिती यांनी मिळून हा कार्यक्रम प्रत्यक्ष अमलात आणला पाहिजे.
आपल्या देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्था विविध प्रकारच्या तण निर्मूलनाचे (घाणेरी, काँग्रेस गवत इ.) उपक्रम यशस्वीरित्या राबवित आहेत. त्यात त्यांना यशही लाभत आहे. 
तेव्हा आपणही रानमोडी निर्मूलन उपक्रम आपल्याकडील परीसरात राबवूया आणि या निसर्ग स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊया 😊

फारूक म्हेतर  - कोल्हापूर 
9028816060 
farukarise@gmail.com 

 

Comments

Popular posts from this blog

महामार्गाचा महामार्ग - Eco-Friendly Highways

कारवी' एक नैसर्गिक चमत्कार

Myristica Swamp