Climate Change
Climate Change ' नेमिची येतो मग पावसाळा ...' वर्षानुवर्षे ऋतूमागून ऋतू येतात आणि जातात. दरवर्षी पावसाचे आगमन होते. कधी तो लवकर येतो तर कधी उशिरा! एकंदरीतच वरील ओळीतून आपल्याला हा अर्थ बोध होतो. या वर्षी जुन महिन्यात प्रत्येक आठवड्यात एकदा तरी जंगलात जाणे झालेच. तसे ते दरवर्षी होतेच परंतू करोना मुळे गेल्या दोन-तीन वर्षात या मधे खंड पडला होता. जूनचा पहिला आठवडा पहिल्या आठवड्यात जंगलात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. पक्षी आपापल्या जोड्या जमवण्यात मग्न होते, त्यांच्या मधुर कोर्टशीप काॅल्सनी आसमंत भरून गेला होता. सुंदर सुंदर फुलपाखरे नुकतीच कोशातून बाहेर पडून जोडीदाराच्या शोधात भिरभिरत होती. जंगलात बहुतांश ठीकाणी उतारावर, मोकळ्या रानात कारवी ही दर सात-आठ वर्षांनंतर फुलणारी झुडपी वनस्पती भरपूर प्रमाणात होती. ती मार्च पासूनच पूर्णपणे निष्पर्ण झाली होती. खुपश्या झाडा झुडपांना मोहक पालवी फुटत होती. जंगल सरड्यांच्या नरांना गळ्या भोवती भड़क रंग आले होते व त्यांची मादीला रिझवण्यासाठी पळापळी, द्वंद युद्ध सुरू होते....