Posts

Showing posts from March, 2024

रानमोडी Chromolaena odorata, Eupatorium odoratum

  रानमोडी Chromolaena odorata, Eupatorium odoratum रानमोडी ही उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय वनस्पती आहे.  मुळची अमेरिकन असलेली ही वनस्पती दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळते. अतिशय उपद्रवी अशी ही वनस्पती आशिया, आफ्रिका खंडात आगंतुक पणे पसरली आहे. जगभर ही वनस्पती सर्वात घातक तण म्हणून गणली जाते.  ऑस्ट्रेलिया, अमेरिका, हवाई या देशांनी ही कुप्रसिद्ध वनस्पती प्रतिबंधित केली आहे. 2 ते 3 मिटर उंच वाढणारी ही झुडूप वर्गातील वनस्पती झपाट्याने वाढत जाते.  ही वनस्पती विविध प्रकारच्या जमिनीत, वातावरणा मध्ये सहजपणे वाढते. अगदी 1500mm पाऊस पडणाऱ्या ठिकाणी आणि 500mm पेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी पण तग धरून रहाते.  20॰ C पासून 45॰C तापमानात आरामात वाढते.  फक्त दाट जंगलात आणि अति उंच ठिकाणी वाढत नाही. जंगलातील खुल्या जागा, जंगलाबाहेरच्या जमिनीत, शेतातील बांधावर, पडीक जमिनीत ही झपाट्याने पसरते. जेथे ही वनस्पती वाढते तेथे ती अत्यंत दाट झाडी तयार करते त्यामुळे तेथील स्थानिक वनस्पती घुसमटुन जातात. ही वनस्पती घनदाट होऊन जाते त्यामुळे या वनस्पती खालील इतर अनेक वनस्पती ऊन, जम...